3.6 C
New York

Sharad Pawar : लोकसभा नंतर विधानसभेतही पवार विरुद्ध पवार; हे दोन नावाची चर्चेत

Published:

बारामती

नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई पाहायला मिळाली होती. या निवडणुकीमध्ये मोठ्या पवार साहेबांनी बाजी मारली आहे. तर अजित पवार यांना पराभव पत्करावा लागला. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) देखील पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. बारामती विधानसभा (Baramati Assembly) मतदार संघात शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वतीने हे या दोन पवारांमधून एका पवार अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही लोकसभेत झालेली लढाई विधानसभेतही पाहायला मिळणार आहे, मात्र अजित पवारांच्या विरोधात शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार याची उत्सूकता आतापासूनच वाढली आहे. शुक्रवारी बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळेंच्या स्वागता आधी बारामतीत आमदार रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

बारामती लोकसभेत अजित पवार गट विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी चुरशीची लढाई झाली. या विजयानंतर आमदार रोहित पवारांनी बारामतीमध्येही संपर्क कार्यालय सुरु केले आहे. यामुळे शरद पवार गटातही विधानसभेच्या उमेदवारीसाठी स्पर्धा सुरु झाली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकसभेच्या प्रचारादरम्यान अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे संपूर्ण कुटुंब सुप्रिया सुळेंचा प्रचार करताना दिसले. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे मतदारसंघात भावी आमदार म्हणूनही बॅनर झळकले. बारामतीमध्ये सख्ख्या भावाच्याविरोधात श्रीनिवास पवारांनी प्रचार केला. यामुळे त्यांचे पुत्र युगेंद्र पवार यांची अजित पवार गटाने बारामती कुस्तीगिर संघटनेच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्याची चर्चा सुरु झाली. पवार विरुद्ध पवार हा सामना आता राजकीय आखाड्यातून कुटुंबातही सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img