मुंबई
मुंबईतील चेंबूर कॅम्प (Chembur) परिसरात एका घरात सिलेंडरचा भीषण (Cylinder Blast) स्फोट झाला आहे. आज सकाळी 7 वाजता वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. यात 9 जण जखमी झाले असून यातील काही जण हे गंभीर असल्याची माहिती आहे. जखमी असणाऱ्यांना जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या दोन दुकानांचे आणि रस्त्यावरील गाड्यांचे ही मोठे नुकसान झाले आहे.
मुंबईच्या चेंबूर कॅम्प परिसर येथे गॅस सकाळी सात वाजताच्या दरम्यान घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यात 9 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या दोन दुकानांचे आणि रस्त्यावरील गाड्यांचे ही मोठे नुकसान झाले आहे. तर या घरातील सात जण आणि रस्त्यावरून जाणारी एक व्यक्ती जखमी झाली आहे. जखमीना शताब्दी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून इथला मलबा काढण्याचे काम सुरू आहे.
मुंबईच्या चेंबूर कॅम्प परिसरमध्ये सकाळी सातच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे.यात आठ जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या दोन दुकानांचे आणि रस्त्यावरील गाड्यांचे ही मोठे नुकसान झाले आहे.तर या घरातील सात जण आणि रस्त्यावरून जाणारी एक व्यक्ती जखमी झाली आहे.जखमी ना शताब्दी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून इथला मलबा काढण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 7 च्या सुमारास सीजी गिडवाणी रोड स्मोक हिल सलूनच्या मागे गोल्फ क्लबजवळ असलेल्या एका घरात सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या घटनेत ओम लिंबाजिया, अजय लिंबाजिया, पूनम लिंबाजिया, मेहक लिंबाजिया, ज्योत्स्ना लिंबाजिया, पियुष लिंबाजिया, नितीन लिंबाजिया, प्रीती लिंबाजिया, सुदाम शिरसाट हे गंभीर जखमी झाले असून या सर्वांना सायन रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.