19.7 C
New York

Ajit Pawar : योगेंद्र पवार यांना दणका, या पदावरून हकालपट्टी

Published:

बारामती

बारामती (Baramati) तालुका कुस्तीगीर परिषदेच्या (Kustigar Parishad) सदस्यांची नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. युगेंद्र पवार (Yogendra Pawar) बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीत युगेंद्र पवार यांना पदावरून हटवल्याचा निर्णय घेण्यात आल्याचा सांगितलं जात आहे. सुप्रिया सुळेंसाठी काम करणाऱ्या युगेंद्र पवारांवर अजित पवारांनी (Ajit Pawar) राग काढल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीने विशेषतः बारामतीतील निवडणुकीने पक्षासोबतच कुटुंबाचेही दोन तुकडे झालेले दिसले. अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे कुटुंब हे सुप्रिया सुळेंच्या बाजूने प्रचार करत होते. त्यांचा मुलगा तथा अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार देखील काकांच्या विरोधात बारामतीमध्ये प्रचार करत होता.

युगेंद्र पवार बारामती कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. कुस्ती संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांचे तालुक्यातही चांगले काम आहे. असे असताना बुधवारी झालेल्या एका बैठकीत युगेंद्र पवार यांना अध्यक्षपदावरुन काढल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात काम केल्यामुळे अजित पवारांनी हा राग काढला असल्याचे म्हटले जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img