लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपप्रणित NDA आला २९१ जागा मिळाल्या आहेत तर विरोधकांच्या INDIA आघाडीला २३४ जागा मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. या एकूण राजकीय परिस्थितीत बिहारचे नितीशकुमार (Nitish Kumar) आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबूं नायडूंचे महत्व चांगलंच वाढल आहे. या दोन्ही नेत्याना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न इंडिया आघाडी करू शकते. INDIA आणि NDA ची स्वतंत्र बैठक आज दिल्लीत होणार आहे. या बैठकीसाठी नितीशकुमार आणि तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे दोघेही एकाच विमानाने जाणार असल्याने चर्चाना उधाण आलं आहे.
आज INDIA आघाड़ीची ६ वाजता पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक होणार आहे तर ४ वाजता NDA ची बैठक होईल. तेजस्वी यादव हे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जातील तर नितीशकुमार हे NDA चाय बैठकीसाठी जाणार आहे. मात्र एकाच विमानाने दोन्ही नेते जाणार असल्याने चर्चाना उधाण आलं आहे.. बीहारमध्ये नितीशकुमार यांच्या JDU १२ जागांवर आघाडी आहे. त्यामुळे नितीशकुमार यांचे महत्व वाढलं आहे. इंडिया आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी नितीशकुमार यांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे नितीशकुमार यांच्या भूमिकेकडे लक्ष्य लागलं आहे. आत्तापर्यंतचा इतिहास बघता नितीश कुमार यांचा ते कधीही पलटी मारु शकतात. त्यामुळे आताही राजकीय परिस्थिती पाहून नितीशकुमार पुनः एकदा इंडिया आघाडीसोबत जाणार का? असा प्रश्न निर्माण झालाय.
नितीशकुमार यांच्याशिवाय चंद्राबाबू नायडू यांनाही इंडिया आघाडी सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहे. हे दोन्ही नेते इंडिया आघाडीसोबत आले तर इंडिया आघाडीचा आकडा २३४ वरून थेट २६७ पर्यंत जाईल. मग बाकी इतर अपक्षांना सोबत घेऊन इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा सुद्धा करू शकते. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होणार असून याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे.