23.1 C
New York

Lok Sabha Result : निवडणुकीत ‘या’ सेलिब्रिटींच उजळलं नशीब

Published:

अनेक सेलिब्रिटींनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर त्यांच्या मोर्चा राजकारणाच्या Lok Sabha Result दिशेने वळवला. त्यांनी राजकारणात देखील स्वतःचं स्थान भक्कम केलं. पण लोकसभा निवडणूक 2024 मधील चित्र काहीसं वेगळं ठरलं. पहिल्यांदा निवणुकीसाठी रिंगणात उतरलेली अभिनेत्री कंगना रनौत यांनी बाजी मारली, तर अनेक दिग्गज सेलिब्रिटी उमेदवारांना अपयश स्वीकारावं लागलं… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त लोकसभा निवडणुकीच्या निकालांची चर्चा रंगली आहे.

मनोज तिवारी : ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी उभे होते. मनोज तिवारी 137066 मतांनी विजयी झाले आहे. त्यांना 821567 मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसचे कन्हैया कुमार यांना 684501 इतक्या मतांनी दुसऱ्या स्थानावर आहेत.

रवी किशन : रवी किशन यांचा देखील विजय झाला आहे. त्यांनी गोरखपूरमधून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली. रवी किशन यांनी 103526 मतांनी विजय मिळवला आहेय. त्यांनी 585834 जनतेनं मत दिलं आहे. तर काजल निषाद 482308 इतक्या मतांनी समाजवादी पक्षाच्या दुसऱ्या स्थानावर आहेत.

दिनेशलाल यादव ‘निरहुआ’: निवडणुकीच्या रिंगणात भोजपुरी अभिनेते निरहुआ देखील उतरले होते. जेथे त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. दिनेशलाल यादव यांना समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांनी 161035 मतांनी हरवलं.

शत्रुघ्न सिन्हा : दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना देखील अपयशाचा सामना करावा लागला आहे. पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणुक लढवली होती. त्यांना भाजपच्या सुरेन्द्रजीत सिंह आहलूवालिया यांचा विजय झाला.

उत्तर महाराष्ट्रात भाजप-शिंदेंना सहा जागांचा फटका

अरुण गोविल : मेरठ लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल उभे होते, 10585 मतांनी जिथे ते विजयी झाले, तर 535884 मतांसह दुसऱ्या स्थानावर समाजवादी पक्षाच्या सुनीता वर्मा होत्या. अरुण गोविल यांना एकूण 546469 मते मिळाली.

कंगना रनौत : पहिल्यांदा निवडणूक लढवत कंगना रनौत यांनी बाजी मारली आहे. कंगना यांनी 74755 मतांनी विजय मिळवला आहे. कंगना यांना 537022 मत दिलं आहे.

अरुण गोविल : ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल मेरठ लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उभे होते, जिथे ते 10585 मतांनी विजयी झाले, तर समाजवादी पक्षाच्या सुनीता वर्मा 535884 मतांसह दुसऱ्या स्थानावर होत्या. अरुण गोविल यांना एकूण 546469 मते मिळाली.

हेमा मालिनी : भाजपकडून मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या हेमा मालिनी 293407 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 510064 मते मिळाली, तर काँग्रेसचे मुकेश धनगर 216657 मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img