7.3 C
New York

PM Narendra Modi : मोदींकडून पंतप्रधानपदाचा राजीनामा

Published:

नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीचे निकाल (Loksabha Election) काल समोर आले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने (NDA) 292 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळं आता भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.

17 व्या लोकसभेची मुदत संपत असून लवकरच नवे सरकार स्थापन होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रभवन गाठले आहे. त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला आहे. स्वत: राष्ट्रपतींना ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. मुर्मू यांनी मोदींचा राजीनामा मंजूर केला असू्न आजपासून मोदी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

014 मध्ये भाजपने मोदींच्या नेतृत्वाखालील 282 जागा जिंकल्या होत्या. तर 2019 च्या निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकून स्वबळावर बहुमत मिळवले होते. मात्र, यावेळी मित्रपक्षांना सामावून घेत एनडीएला बहुमत मिळवण्यात यश आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img