26.2 C
New York

Beed Lok sabha : पकंजा मुंडेंचा पराभव, निकालानंतर परळीत वाहनांची तोडफोड

Published:

बीडमध्ये झालेल्या Beed Lok sabha  हायव्होल्टेज लढतीत बजरंग सोनवणे यांनी 7 हजार मतांनी पकंजा मुंडेंचा पराभव केला आहे. शेवटच्या लढतीपर्यंत ही लढत अत्यंत चुरशीची ठरली. मात्र काल रात्री बीडच्या परळी परिसरात रात्री अकराच्या सुमारास अज्ञातांनी रस्त्यावर उभे असलेल्या चार चाकी वाहनांचे अज्ञातांकडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अज्ञात समाजकंटाकांकडून ऑटो आणि कारच्या काचा फोडण्यात आले. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Beed Crime News) करण्यात आले आहे.

बीडच्या परळीत काल रात्री अकराच्या सुमारास अज्ञातांनी रस्त्यावर उभे असलेल्या चार चाकी वाहनांचे अज्ञातांकडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. वीज पुरवठा बंद असल्याचा फायदा घेत रात्री 12 च्या दरम्यान परळीतील जुन्या गाव भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चाकी,ऑटोच्या काचा फोडल्याने नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसान झालेले वाहनधारक परळी शहर पोलीस स्टेशन व संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी जमलेले आहेत.

मराठा आंदोलन महायुतीच्या मुळावर

Beed Lok sabha अज्ञातांवर कारवाई करण्याची मागणी

पाऊस वारा झाल्यानंतर परळी शहरातील लाईट गेली होती आणि त्याच काळात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने रस्त्याच्या समोर पार्किंग मध्ये लावलेले वाहन फोडले आहेत हे नेमके कोणी फोडले कशामुळे फोडले हे अद्याप समजले नाही.

Beed Lok sabha पंकजा मुंडेंचा पराभव

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत बीड विधानसभे मतदारसंघातील आमदार संदीप क्षीरसागर हे सोबत राहिले, या व्यतिरिक्त कोणही बडा नेता नसताना बजरंग सोनवणे यांनी पूर्ण जिल्हा पालथा घातला आणि यापूर्वीच्या राजकीय अनुभवाचा फायदा घेत तीन ते चार आठवड्याच्या मेहनतीवर सोनवणे यांनी मोठी ताकद निर्माण केली. बजरंग सोनवणे हे तब्बल साडेसहा लाखापेक्षा जास्त मते घेऊन खासदार झाले, मात्र मनोज जरांगे पाटील यांचा बजरंग सोनवणे यांच्या या खासदारकीच्या प्रवासामध्ये सर्वाधिक मोठा वाटा राहिला. बीड परिसरामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरचा लढा उभा राहिला तो मात्र या लढ्याचा सर्वाधिक परिणाम हा बीड जिल्ह्यामध्ये जाणवत होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img