23.1 C
New York

Maratha Reservation : मराठा आंदोलन महायुतीच्या मुळावर

Published:

मुंबई

राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने राज्यातील चर्चेचा विषय बनला होता. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रमाणात आश्वासन पूर्ण करायला पाहिजे होते ते करण्यात न आल्याने मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पूर्वीच राज्य सरकारला इशारा दिला होता. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता राज्यात जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला (MahaYuti) बसला आहे. महायुतीचे 18 उमेदवार जरांगे फॅक्टर मुळे पराभूत झाले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रभावाखाली असलेल्या मराठवाडा, विदर्भ याच्यासह नाशिक परिसरात महायुतीला मोठा फटका बसला आहे. महायुतीला पाच वर्षांपूर्वी याच विभागातून भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांनी यावेळी भाजपला अक्षरश खडीसाखरासारखे बाजूला केले आहे. परिणामी निवडणुकीच्या मैदानात लढत लढत भाजपचे उमेदवार धारातीर्थी पडले.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रभाव असलेल्या विदर्भ आणि मराठवाडा लोकसभेच्या एकूण 18 जागा आहे. त्यामध्ये या निवडणुकीमध्ये महायुतीला केवळ तीन जागांवर विजयी मिळवता आला आहे. त्यापैकी 2 जागा विदर्भातून तर 1 जागा मराठवाड्यातून विजयी झाले आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये महायुतीला 16 जागांवर विजय मिळवला होता.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात महायुती विरुद्ध वातावरण तयार झाले होते विशेषता मराठा समाजाचा दोष भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अधिक असल्याचं या निवडणुकी मधून दिसून येत आहे भाजपचे विद्यमान मंत्र्यांना देखील मराठा आरक्षणाचा फटका बसला आहे जालन्यातील गेल्या अनेक वर्षांपासून खासदार असलेले रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा लागला आहे तसेच बीडमध्ये पंकजा मुंडे यांना देखील मराठा आरक्षणाचा पडता बसला आहे.

रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांसारख्या दिग्गजांचा दारुण पराभव झाला. भाजपला मराठवाड्यात भोपळाही फोडता आला नाही. शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगरची एक जागा जिंकत कशीबशी आपली प्रतिष्ठा राखली. एकंदरीत ८ पैकी ७ जागा महायुतीने गमावल्या. दुसरीकडे विदर्भातही महायुतीची चांगलीच दाणादाण उडाली. १० पैकी तब्बल 7 जागांवर त्यांना पराभव स्विकारावा लागला. महायुतीच्या या पराभवाला मनोज जरांगे फॅक्टर कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.

त्यावेळी महायुतीला विदर्भात ९ आणि मराठवाड्यात ७ जागांवर विजय मिळवता आला होता. यंदा या दोन्ही विभागात महायुतीची चांगलीच घसरगुंडी झाली. त्यांना केवळ ३ जागाच जिंकता आल्या. जालना, लातूर आणि नांदेड हे मतदारसंघ काँग्रेसने खेचून घेतले. ठाकरे गटालाही सहानुभूतीचा मोठा फायदा झाला. हिंगोली, परभणी आणि धाराशिव मतदारसंघात त्यांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरीकडे शरद पवार यांना देखील मतदारांनी चांगली साथ दिली. बीडमध्ये बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत भाजपला हादरा दिला.

महायुतीच्या विदर्भातील पराभूत जागा

अमरावती- नवनीत राणा- BJP
वर्धा- रामदास तडस- BJP
रामटेक- राजू पारवे- ShivSena (Shinde)
गडचिरोली-चिमूर-अशोक नेते- BJP
चंद्रपूर- मुनगंटीवार- BJP
यवतमाळ – वाशिम- राजश्री पाटील- ShivSena (Shinde)
भंडारा-गोंदिया-सुनील मेंढे- BJP

महायुतीच्या मराठवाड्यातील पराभूत जागा

हिंगोली- बाबुराव कोहळीकर- ShivSena (Shinde)
लातूर- सुधाकर शृंगारे- BJP
उस्मानाबाद (धाराशीव)- अर्चना पाटील- NCP (Ajit Pawar)
नांदेड- प्रतापराव चिखलीकर- BJP
परभणी – महादेव जानकर- RSP
जालना- रावसाहेब दानवे- BJP
बीड-पंकजा मुंडे- BJP

या’ मतदारसंघात देखील मराठा फॅक्टर

नाशिक- हेमंत गोडसे- ShivSena (Shinde)
अहमदनगर-सुजय विखे पाटील- BJP
सोलापूर- राम सातपुते- BJP
माढा- रणजितसिंह नाईक निंबाळकर- BJP

मनोज जरांगे फॅक्टरचा भाजपा फटका?
आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि महायुती सरकारमध्ये चांगलंच बिनसलं होतं. सत्ताधाऱ्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोप जरांगेंनी केला. त्यातच बीड येथील दंगलीनंतर राज्य सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली. यात मनोज जरांगे यांचं नाव घेण्यात आलं.

त्यातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगेंच्या तोंडातून तुतारीचा वास येतोय, अशी भाषा कॅमेऱ्यासमोर वापरली. त्यामुळे मराठा समाजाचा आणखीच उद्रेक झाला. सोशल मीडियावर फिरण्याऱ्या पोस्टमुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा काहीसा संघर्ष रंगला. देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत जरांगेंनी गंभीर आरोप केले.

पुढे हे प्रकरण थोडं शांत झालं. मात्र, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत असं पाडा की त्यांच्या पुढच्या ७ पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजे, असं मनोज जरांगेंनी मराठा मतदारांना सांगितलं होतं. परिणामी निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय सामना रंगला. याच गोष्टीचा मोठा फटका महायुतीला बसल्याचं बोललं जातंय.

संदिपान भुमरे यांनी जरांगेंची मनधरणी करत त्यांचा मान राखल्याने त्यांना मराठा समाजाने साथ दिली. त्यामुळे खैरेंचा पराभव झाला. रावसाहेब दानवे आपल्या विधानानेच अडचणीत आले अन् मराठा समाजाच्या रोषाला सामोरे गेले, अशीही चर्चा होत आहे. तिकडे बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगेंची सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे मनोज जरांगे फॅक्टरच्या चर्चांनी आणखीच जोर धरला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img