21 C
New York

PM Narendra Modi : शरद पवार गटाचा PM मोदींवर, हल्लाबोल

Published:

देशाच्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीचा (Loksabha Elections) निकाल काल 4 जून रोजी जाहीर झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी या निवडणुकीत विक्रमी मतदान घेऊन तिसऱ्यांदा सत्तेत (BJP) येऊ, असे म्हटले होते. पण, जनतेने सत्ताधाऱ्यांचा (PM Narendra Modi) 400 पार चा स्वप्नभंग केला आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना लगावला.

महेश तपासे म्हणाले की, ४०० पारचा नारा देणाऱ्यांना २५० जागाही मिळाल्या नाहीत. भाजप स्वतः स्वबळावर सत्तेत येऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपकडून आता एनडीएच्या कुबड्या घेऊन सत्तेत राहण्याचा प्रयत्न सुरु आहे, यातच नरेंद्र मोदी यांचे अपयश आहे. नरेंद्र मोदी यांना कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही. पुन्हा सत्तेत येण्या करिता जनतेने मतदानाच्या माध्यमातून मोदींना नाकारले आहे. 56 इंच फुललेल्या छातीतील हवा निघाली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवण्यात येत होता, त्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही, लोकसभेच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे, असे महेश तपासे म्हणाले.

महेश तपासे म्हणाले की, भाजपने महाराष्ट्रात 45 पारचा नारा दिला होता. 2019 मध्ये 23 जागांवर विजयी झालेली भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत 9 जागांवर निवडून आली आहे. यातूनच स्पष्ट होते की महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला आरसा दाखविला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि नंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. देशाच्या लोकशाहीला काळिमा फासून कुठल्यातरी यंत्रणेच्या दबावातून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीचे सरकार आणले. परंतु, ज्या साथीदारांनी सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केलं, त्यांचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं मतदान ट्रान्सफर झाले नाही. या निकालावरून स्पष्ट झाले आहे, असे महेश तपासे म्हणाले.

महेश तपासे म्हणाले की, अजित पवार यांचा पक्ष या निवडणुकीमध्ये रायगड मतदारसंघात विजयी झाला आहे. सुनील तटकरेंचा विजय हा त्यांच्या कर्तृत्वावर झाला आहे. त्यामध्ये अजित पवार यांचे कुठलेही योगदान नाही. बारामती लोकसभा मतदारसंघावर सर्व देशाचे लक्ष होते. बारामतीमध्ये शरद पवार यांचा की अजित पवार यांचा विजय होणार, याकडे सर्वांचे लक्ष होतं परंतु बाप बाप असतो. शरद पवार यांनी महाराष्ट्रात 55 वर्षे काम केलं आहे. सुप्रियाताई सुळे यांनी ३ वेळा विजय मिळवला आहे. लोकशाही आणि लोकसभा ही संवादाच्या माध्यमातून काम करण्याची प्रक्रिया असते. सुप्रियाताई सुळे यांची एक वेगळी ओळख आता राज्यासह देशात निर्माण झाली आहे, असे महेश तपासे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img