21 C
New York

Loksabha Elections : लोकसभेत ‘वंचित’ फॅक्टर फ्लॉप

Published:

मुंबई

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) महाराष्ट्रात मोठी कामगिरी केली होती. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देखील वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडीची ऑफर नाकारुन एकला चलो रेची भूमिका घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीचा राज्यातील लोकसभा निवडणुकीत सुपर फ्लॉप शो पाहायला मिळाला. स्वतः प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनाही अकोल्यामध्ये पराभवाची धुळ चाखावी लागली. त्यामुळे मविआची साथ सोडून वंचित आघाडीने काय मिळवलं? हे न उलघडणारे कोडे आहे.

लोकसभेत वंंचित आघाडीने 35 उमेदवार उभे केले होते. तसेच त्यांनी कोल्हापुरमध्ये शाहू महाराज, सांगलीत विशाल पाटील, बारामतीत सुप्रिया सुळे आणि नागपुरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. मात्र मतदारांनी वंचितच्या उमेदवारांना स्पष्टपणे नाकारल्याचे चित्र दिसले.

दरम्यान, गेल्या लोकसभेसह विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत वंचितच्या मतदानाचा टक्काही घसरल्याचे पाहायला मिळाले. गेल्यावेळी वंचितला राज्यात तब्बल 42 लाख मतं मिळाली होती. वंचितच्या उमेदवारांमुळे ७ ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत व्हावं लागले होते. 2019च्या निवडणुकीप्रमाणे याहीवेळी वंचित फॅक्टर मविआसाठी धोक्याचा ठरेल असं वाटत होते.मात्र मतदारांनी वंचितला स्पष्टपणे नाकारले.

वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर अकोल्यात तिस-या नंबरवर फेकले गेले. पुण्यात तर वसंत मोरेंना केवळ 25 हजार मतांवर समाधान मानावं लागले. तर परभणीतून पंजाबराव डख यांना तर 50 हजार मतांचीही मजल मारता आलेली नाही. तसेच मुंबई उत्तरमधून वंचितच्या उमेदवाराला 1429 मते, मुंबई उत्तर मध्यमधून 3600 मते, मुंबई उत्तर पूर्वमधून 2665, उत्तर पश्चिममधून 5962 मते, मुंबई दक्षिण मधून केवळ 994 मते, दक्षिण मध्य मुंबईतून 7342 मते मिळाली आहेत. त्यामुळे मविआसोबतची मैत्री तोडल्यानेच वंचित फॅक्टर फ्लॉप ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img