23.1 C
New York

Lok Sabha Election : ‘त्या’ रात्री PDCC बँक सुरू ठेवणं मॅनेजरला भोवलं

Published:

बारामती

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मतदारसंघात मतदान पार पडले होते. मतदानाच्या आदल्या रात्र बारामतीतील पुणे जिल्हा मध्यवर्ती (Pune District Central bank) सहकारी बँकेचे शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. आता निवडणूक आयोगाने (Election Commission) या शाखेतील व्यवस्थापकाला निलंबित केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बारामती मतदारसंघात असलेल्या भोर तालुक्यातील वेल्हे येथील बँकेची शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 6 मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा आणि बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोषी आढळल्याने आयोगाने व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img