मुंबई
लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला आहे. महायुती मधील सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या भाजपला (BJP) केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्यातील सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले होते. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, लोकसभेत जो फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. तसंच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून देखील भाजप त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवेल असं वाटत नाही. फडणवीस यांची ज्या ज्या नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. मग ते चंद्रकांतदादा पाटील असतील पंकजा मुंडे असतील किंवा सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे असतील. तरीही इतकं सगळ होऊनही सा सर्वांमध्ये टीकून राहिले ते विनोद तावडे कमबॅक करू शकतात असं, सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांचं हे म्हणणं एकदम एक्झिट मागणं आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी भेट झाली त्यात खलबतं झाली. बावनकुळे यांना देखील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रमध्ये नको आहेत. आपण स्वतःहून ते बाहेर पडत आहेत ते बरं आहे असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
मी काल म्हणाले होते लोकांना वाटलं की मी उत्साहाच्या भरात बोलले. पण मी आज पुन्हा एकदा सांगते देवेंद्र फडणवीस यापुढे कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत. भाजपाचे नेतृत्व आता कधीच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार नाहीत, असे अंधारे म्हणाल्या.