23.1 C
New York

Eknath Shinde : फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर, शिंदेंचे मोठे वक्तव्य

Published:

मुंबई

राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठ्या परभवाला सामोरे जावं लागलं. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) भाजपला मोठा झटका बसला. राज्यात भाजपला (BJP) 28 जागापैकी 9 जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. मला मंत्रिमंडळातील जबाबदारीतून मुक्त करावे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. काही आता जी निवडणूक झाली त्यामध्ये मतदानाची टक्केवारी पाहिली तर मविआला जागा जास्त मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी सारखी आहे. मुंबईत तर आम्हाला 2 लाख मतं जास्त मिळाली आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून काम केलेलं आहे. सगळ्यांचं जे काही यश-अपयश आहे ती आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असंच समजतो. आम्ही टीम म्हणून हे काम केलं आहे. राज्यातदेखील खूप चांगलं काम झालेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, आम्हाला पुढेदेखील राज्यासाठी एकत्र काम करायचं आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी नक्की बोलेन आणि राज्यासाठी एकत्र काम करु. आम्ही एकत्र काम केलं आणि निवडणुकांचे जदे निकाल आले त्याची आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुणाच्या एकट्याची जबाबदारी आहे असं म्हणणारा मी कार्यकर्ता नाही. त्यामुळे मी नक्की त्यांच्याशी बोलेन असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीला कमी जागा मिळण्याचं कारण सर्वांना माहिती आहे. संविधान बदलणार, आरक्षण काढणार, अशी दिशाभूल करुन एक अपप्रचार करुन या ठिकाणी मिळवलेली मतं आहे. त्यामध्ये विरोधकांना काही प्रमाणात यश मिळालं. या विरोधकांची खरे चेहरे जनतेला दिसतील. मूळ मतदार त्यांच्यापासून दुरावले आहेत. त्यांना दोन-दोन लाखांचा लीड मिळायला होतं. पण ते मिळालं नाही. काही काळानंतर ज्यांचा संभ्रम झालाय तो संभ्रम दूर होईल आणि यांचा खरा चेहरा दिसेल असं शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, हे तात्पुरती आहे. हे कायम नाही. मोदी हटाव या विचाराने पछाडलेले लोक होते. तर दुसरीकडे देशाच्या विकासाला पुढे घेऊन जाणारे मोदी होते. काही लोक म्हणत होते की मोदींना तडीपार करा. पण देशाने मोदींना बहुमत दिलेलं आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img