लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) निकाल जवळपास स्पष्ट झाले असून भाजपला (BJP) बहुमत मिळालेले नाही. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. अशा स्थितीत एनडीएतील पक्षांना सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडीच्या (India Alliance) हालचाली वाढल्या. दरम्यान, इंडिया आघाडीने देशात सत्ता स्थापन करण्याचा दावा करावा, हे जुलमी सरकार आपण हटवायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आपल्या देशातील सर्वसामान्यांनी त्यांची ताकद काय असते, हे दाखवनू दिलं. एका बोटाच्या आधारे आपण सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना रोखू शकतो. इंडिया आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा करावा, असंही ते म्हणाले.आमच्यापैकी कोणीही इंडिया आघाडी म्हणून आघाडी आम्ही तयार केली तेव्हा पंतप्रधानपदावर दावा केला नव्हता. उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता निश्चित होईल. त्यासाठी इंडिया आघाडीची उद्या दुपारी बैठक होणार आहे. दिल्लीला संजय राऊत उद्या सकाळी जातील आणि मी उद्या दुपारी दिल्लीला जाईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एकाच विमानातून नितीशकुमार- तेजस्वी यादव दिल्लीला जाणार ?
Loksabha Election चंद्राबाबू नायडू आमच्यासोबत येतील
बिहारमध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे, काही ठिकाणी छोटे घटक पक्ष असून त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. चंद्राबाबू नायडू आणि इतरांशी काँग्रेस आणि इतरांकडून संपर्क केला जात आहे. भाजपने चंद्राबाबू नायडूंनाही कमी त्रास दिला नाही. जे भाजपच्या त्रासाला कंटाळले आहेत ती लोक इंडिया आघाडीत येतील, चंद्राबाबू नायडू आमच्यासोबत येतील, असं ठाकरे म्हणाले. असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपच्या छळवणुकीला सर्व लोक कंटाळली आहेत, सुडाच्या राजकारणाला कंटाळलेले देशभक्त एकत्र येतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात 48 जागा जिंकण्याची आम्हाला अपेक्षा होती. आम्हाला आणखी चार ते पाच जागा मिळतील अशी अपेक्षा होती, असंही ठाकरे म्हणाले.