23.1 C
New York

Devendra Fadnavis : भाजपमधला वाद चव्हाट्यावर, नेत्याचा वरिष्ठांवर निशाणा

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) राज्यात भाजपला मोठा फटका बसला आहे. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला (BJP) 23 जागांवर मिळाल्या होत्या. मात्र या निवडणुकीत भाजपला 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे या संपूर्ण पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. फडणवीस यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली होती. मात्र आता पक्षातील नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj Bharatiya) यांनी थेट केंद्रीय नेतृत्वालाच या संदर्भात जबाबदारी घेणार की नाही असा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारला आहे. त्यामुळे भाजपचे अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालेलं नाही. भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीने 17 जागा जिंकल्या असून, याऊलट महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या आहेत. भाजपाच्या अपय़शानंतर आता पक्षाचे नेते आरसा दाखवत आहेत. भाजपा नेते मोहित कंबोज यांनी महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी कोण घेणार आहे? अशी विचारणा केली आहे. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांची जबाबदारी ठरवायला हवी असंही मोहित कंबोज म्हणाले आहेत.

मोहित कंबोज यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, भाजपा महाराष्ट्र आणि भाजपा मुंबईने रिअॅलिटी चेक करण्याची गरज आहे. या पराभवाची जबाबदारी कोण घेणार आहे? फक्त एका व्यक्तीची लाईन छोटी करण्याच्या नादात पक्षाचं नुकसान केलं. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांची जबाबदारी ठरवायला हवी.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img