-3 C
New York

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर करणार पुन्हा छोट्या पडद्यावर कम बॅक!

Published:

2024 वर्षाची सुरुवात मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) दमदार केली. ती एका मागोमाग एक अश्या कमालीच्या प्रोजेक्ट्स मधून ती दिसत राहिली. ” लुटेरे , चाचा विधायक है हमारे 3 , 36 डे ” अश्या भन्नाट प्रोजेक्ट्स नंतर ती आता झी मराठीच्या आगामी कार्यक्रमात झळकणार आहे. बॅक टू बॅक वेगवेगळ्या रूपात ती प्रेक्षकांची मन जिंकून घेत असताना तिच्या सोशल मीडिया वरच्या रिलने आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अमृता आता नक्की काय करणार आहे ती मालिका करणार की रियालिटी शो अश्या अनेक चर्चांना उधाण आल आहे लवकरच या बद्दल प्रेक्षकांना समजेल असं देखील कळतंय. वेब शो, चित्रपट आणि आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अमृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या बद्दल ती खूप उत्सुक असल्याचं कळतंय.

टीम इंडियाला धक्का की विजय पक्का?

सोशल मीडिया वर रील पोस्ट करत नव्या प्रोजेक्ट बद्दल अमृता म्हणते ” नव्या रंगात नव्या ढंगात कमिंग सून ” ! आता नेमका हा प्रोजेक्ट काय हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. ग्लॅमरस स्टार म्हणून अमृता कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आहे आणि आता तिच्या या पोस्ट ने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोशल मीडिया वर सक्रिय राहून ती कायम तिच्या नवनवीन प्रोजेक्ट्स बद्दल प्रेक्षकांना हिंट देत असते आणि आता हा नवा प्रोजेक्ट घेऊन पुन्हा एकदा ती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.या नव्या प्रोजेक्ट सोबत अमृता येणाऱ्या काळात ” कलावती , ललिता बाबर , पठ्ठे बापूराव ” अश्या चित्रपटात दिसणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img