19.7 C
New York

Saie Tamhankar: तब्बल ११ वर्षानंतर एकत्र झळकणार ‘दुनियादारीचे’ स्टार,

Published:

Saie Tamhankar: ११ वर्षानंतर पुन्हा एकदा सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, आणि स्वप्नील जोशी या तिघांची एक्की मोठ्या पडद्यावर

Saie Tamhankar: मराठी सिनेसृष्टीतील ३ प्रसिद्ध अभिनेते परत एकदा नव्या पडद्यावर दिसणार आहेत. सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, आणि अंकुश चौधरी यांचा एक नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नाव आणि अन्य बाबी जरी समोर आल्या नसल्या तरी यात मराठीतील आघाडीचे कलाकार झळकणार आहेत. तब्बल ११ वर्षानंतर तिघांचा SWAG पुन्हा एकदा दिसणार आहे. चित्रपटाची घोषणा होताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी आणि संजय जाधव यांच्या टीमची घोषणा करण्यात आल्यापासून प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजायला लागली आहे. प्रेक्षक आता आतुरतेने या सिनेमाची वाट पाहत आहेत. कारण प्रेक्षकांची आवडती टीम आता पुन्हा एकदा नवीन चित्रपट घेऊन येत आहे.

या नवीन चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरु झाली आहे. .वी.के पिक्चरस्, व्हिडीओ पॅलेस आणि मैटाडोर प्रोडक्शन प्रस्तुत या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. तर सिनेमाचे निर्माते अमेय खोपकर, स्वाती खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीनं आहेत.

http://अमृता खानविलकर करणार पुन्हा छोट्या पडद्यावर कम बॅक!

चित्रपटाबाबत सांगताना अमित खोपकर म्हणाले,” संजय जाधव यांच्यासारखा धमाकेदार दिग्दर्शक यांच्यासोबत ‘येरे येरे पैसा’, ‘येरे येरे पैसा ३’, कलावती हे यशस्वी चित्रपट केल्यानंतर आता हा नवा कोरा चित्रपट करायला मिळतोय. अंकुश, सई, स्वप्नील यांसारखे प्रसिदध कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या टीमसोबत माझं जुनं नातं आहे. आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा धमाका तर नक्कीच होणार आणि चित्रपट गाजवणारंच.”

चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही , तसंच चित्रपटाची कथा कशी असेल त्याबद्धलही निर्मात्यांनी काहीच माहिती दिलेली नाहीये. चित्रपटावर काम सुरु झालंय. आणि यात प्रेक्षकांची एक्की सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी आणि अंकुश चौधरी हे ‘दुनियादारी’ नंतर पुन्हा एकदा मचवनार आहेत हे स्पष्ट झालंय. चाहत्यांच्या मनात आता ‘टिक टिक वाजते डोक्यात’ अशी अवस्था झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img