लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती Elections Results आले आहेत. या निवडणुकीत नरेंद्र मोदींचं चारशे पारचं स्वप्न भंगलं आहे. चार राज्यात भाजपला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थानातील जागा कमी झाल्याने भाजपाचं बहुमताचं गणित बिघडलं आहे. या राज्यांत भाजपाच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. यामुळे आता सरकार स्थापन करण्यातही अडचणी निर्माण होणार आहेत. मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील, अर्जुन मुंडा, आरके सिंह आदींसह मोदी सरकारमधील 19 मंत्र्यांचा पराभव झाला.
अजूनही भाजप हाच एनडीए आघाडीत सर्वात मोठा पक्ष आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीत काँग्रेस असतानाही अन्य प्रादेशिक पक्ष त्यांच्या राज्यात ताकदवान राहिले. तसेच एनडीएमध्ये तेलुगू देसम पार्टी (16 जागा), जेडीयू (12 जागा), लोजपा (5) आणि शिंदे शिवसेना (7 जागा) भाजपापासून वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले.
इंडिया आघाडीने लहान पक्षांना सोबत घेत भाजपसमोर आव्हान उभे केले. तामिळनाडूत द्रमुकने 20 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर पश्चिम बंगालमध्ये टीएमसीने 30 जागा जिंकल्या. या व्यतिरिक्त समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात भाजपला मोठा झटका दिला. सपाने जवळपास 40 जागा जिंकल्या. आम आदमी पार्टीने पंजाबात तीन जागा जिंकल्या. ठाकरे गटाने 9, शरद पवार गटाने 7, राजदने चार जागांवर आघाडी घेतली. या पक्षांचा आघाडीला मोठा फायदा झाला. अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी यांना यंदा पराभवाचा झटका बसला. मागील निवडणुकीत येथे त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. परंतु, यंदा काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांनी त्यांचा पराभव केला. झारखंडमधील खुंटी मतदारसंघात अर्जुन मुंडा यांचा काँग्रेस उमेदवार कालीचरण मुंडा यांनी 1.49 लाख मतांनी पराभव केला.
‘या’ निवडणुकीत सेलिब्रिटींच उजळलं नशीब
बिहारमधील आरा मतदारसंघात आरके सिंह यांचा 45 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. चंदौली येथून महेंद्रनाथ पांडे यांनी समाजवादी पार्टीचे बिरेंद्र सिंह यांना पराभवाचा धक्का दिला. उत्तर प्रदेशात मंत्री अजय मिश्रा टेनी, साध्वी निरंजन ज्योती, कौशल कुमार, भानुप्रतापसिंह वर्मा यांना पराभवाचा धक्का बसला. केरळमध्ये काँग्रेसचे शशी थरुर आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यात चुरशीची लढत झाली. काही फेऱ्यांमध्ये चंद्रशेखर आघाडीवर होते. परंतु, शशी थरुर यांनी बाजी पलटवली आणि विजय साकारला
महाराष्ट्रात दिंडोरी मतदारसंघात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, जालना मतदारसंघात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पश्चिन बंगालमध्ये राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक, सुभाष सरकार, केरळमध्ये व्ही. मुरलीधरन, राजस्थानात कैलाश चौधरी, कर्नाटकात भगवंत खुबा, तामिळनाडूत एल. मुरुगन आणि बिहारमध्ये संजीव बाल्यान यांचा पराभव झाला.