10.2 C
New York

Elections Results : नाशिक, जळगाव, नंदूरबार अन् धुळ्यात कुणाची आघाडी?

Published:

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू Elections Results असून देशात सर्वत्र विरोधकांची इंडिया आघाडी भाजपप्रणित एनडीए आघाडीला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी भाजपला जोरदार धक्का देताना दिसत आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. उत्तर महाराष्ट्रातही वारं फिरलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे पिछाडीवर गेले आहेत. सकाळी अकरा वाजेपर्यंत येथे मविआचे उमेदवारी राजाभाऊ वाजे यांनी जवळपाप 50 हजार 879 मतांची आघाडी घेतली आहे.

धुळे मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे 14 हजार 280 मतांनी आघाडीवर आहेत. भामरे यांना 1 लाख 80 हजार 907 मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीच्या डॉ. शोभा बच्छाव यांना 1 लाख 66 हजार 627 मते मिळाली आहेत. जळगाव मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेर महायुतीच्या स्मिता वाघ यांनी मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीचे करण पवार यांना 59986 तर स्मिता वाघ यांना 108426 मते मिळाली आहेत. वाघ यांनी 48,440 मतांची आघाडी घेतली आहे.

नणंद-भावजयीमध्ये कडवी झुंज

नंदूरबार लोकसभा मतदारसंघातही भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. येथे काँग्रेस उमेदवार अॅड. गोवाल पाडवी यांना आठव्या फेरीत आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार डॉ. हिना गावित यांना उमेदवारी दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img