3.5 C
New York

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मुंबईचा बालेकिल्ला राखण्यात यश

Published:

मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना त्यांचा बालेकिल्ला सांभाळण्यात मोठं यश आलं आहे. मुंबईत (Mumbai) 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार विजयी झाले आहेत. केवळ उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांचा विजय झाला आहे. उत्तर मुंबईची जागा वगळता मुंबईतील इतर सर्व जागा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली आहेत.

विशेष म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ शकली नाही. आगामी काळात या निवडणुका लवकर होतात का? ते स्पष्ट होईल. पण मुंबई महापालिकेची निवडणूक न झाल्यामुळे मुंबईत कुणाची ताकद आहे? हे स्पष्ट होणं कठीण होतं. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मुंबईत नेमकी कोणत्या राजकीय पक्षाची ताकद आहे, हे निवडणुकीशिवाय समजणार नव्हतं. खरंतर मुंबई आणि शिवसेना यांचं एक वेगळं समीकरण राहिलेलं आहे. पण शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईत यश मिळतं का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मुंबईत शिवसेना पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणूक ही मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत ठाकरेंनी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाला चारी मुंड्या चित केलं आहे. मुंबईत एकूण सहा लोकसभेच्या जागा आहेत. या सहा पैकी 4 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार होते. या चारही जागांवर आपल्या उमेदवारांना विजयी करण्यात उद्धव ठाकरे यांना मोठं यश आलं आहे.

मुंबईच्या सहा जागांवरचा निकाल नेमका काय?
दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत हे उमेदवार होते. तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव या उमेदवार होते. या ठिकाणी अरविंद सावंत हे घवघवीत मतांनी विजयी झाले आहेत.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून राहुल शेवाळे हे उमेदवार होते. विशेष म्हणजे ते तिथले विद्यमान खासदार होते. तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई हे उमेदवार होते. या मतदारसंघात अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे रविंद्र वायकर उमेदवार होते. तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर उमेदवार होते. अमोल कीर्तिकर यांचा विजय झाला आहे.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाची लढत ही अतिशय अटीतटीची ठरली. अखेर अंतिम क्षणी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचा या मतदारसंघात विजय झाला.

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांनी भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला आहे.

मुंबईतील केवळ एका जागेवर महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांचा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजय झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img