19.7 C
New York

Lok sabha Election : नगरमध्ये सुजय विखे-निलेश लंकेंमध्ये कांटे की टक्कर

Published:

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात Lok sabha Election यंदा कांटे की टक्कर दिसत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात अटीतटीचा सामना होताना दिसत होती. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आधी पोस्टल मतमोजणी करण्यात आली. यामध्ये सुजय विखेंनी आघाडी घेतली होती. पोस्टल मतमोजणीत सुजय विखे यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढाई दिसून आली.

पराभूत उमेदवारांना मिळणार ‘हा’ अधिकार

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत सुजय विखेंना 18 हजार 444 तर निलेश लंके यांना 18 हजार 224 मते मिळाली. पहिल्या फेरीत सुजय विखेंना फक्त 190 मतांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या फेरीत मात्र चित्र पालटले. नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरु असून यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांनी 851 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर पुन्हा सुजय विखेंनी आघाडी घेतली आहे. मतमोजणीत सुजय विखेंना 27 हजार 466 तर निलेश लंकेंना 24 हजार 997 मते मिळाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img