21 C
New York

Loksabha Election : मोदी सरकारला धक्का, स्मुर्ती इराणीसह 9 मंत्री मागे

Published:

देशात गेल्या काही तासांपासून लोकसभा निवडणूक 2024 साठी Loksabha Election मतमोजणी सुरु असून आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, देशात एनडीए 240 आणि इंडिया आघाडी 251 तर इतर पक्ष 22 जागांवर पुढे आहे. सध्या भाजप 201 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, यूपी आणि राजस्थानमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. यूपीमध्ये भाजप केवळ 38 जागांवर आघाडीवर असून समाजवादी पार्टी 28 जागांवर आघाडीवर आहे. तर स्मृती इराणी अमेठी लोकसभा मतदारसंघात मागे आहे. माहितीनुसार, राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर आहे. तर मोदी सरकारमधील मंत्री असलेले राव इंद्रजीत सिंग हरियाणातील गुरुग्राम लोकसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणेही मागे पडले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा डंका

तर केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी बारमेर मतदारसंघातून 1.27 लाख मतांनी पिछाडीवर आहेत. राजस्थानमध्ये भाजप 13 जागांवर तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. तर जोधपूरच्या जागेवर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत 19 हजार मतांनी पुढे आहेत. कानेरमधून अर्जुनराम मेघवाल 18142 मतांनी पुढे आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी 1.34 लाख मतांनी पुढे आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोटामधून 15 हजार मतांनी पुढे आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत सिंह झालावाडमधून 1.50 लाख मतांनी आघाडीवर आहे.

सातव्या टप्यातील मतदान झाल्यानंतर अनेक एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र आता अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सध्या भाजप 201 जागांवर आघाडीवर आहे अशा स्थितीत एकट्या भाजपला बहुमत मिळणे कठीण आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img