महाराष्ट्रातील 48 जागांचे सुरुवातीचे कल समोर आले आहेत. शरद पवार Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यामध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीमध्ये 10 जागांवर शरद पवारांनी निवडणूक लढवली होती, उमेदवार त्या दहाही जागांवर आघाडीवर आहेत. अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांनी नव्या जोमानं पक्ष बांधणी केली. लोकसभेसाठी दिवसरात्र प्रचार करत मोठं यश मिळावलं आहे. सर्व उमेदवार आघाडीवर 11 वाजेपर्यंतच्या कलामध्ये 10 जागांवरील आहेत. भिवंडीमधील राज्यमंत्री कपिल पाटील आणि दिंडोरीमध्ये राज्यमंत्री भारती पवार यांना झटका बसलाय. हे दोन्ही उमेदवार सुरुवातीच्या कलामध्ये पिछाडीवर असून शरद पवार यांचे उमेदवार
बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंची मोठी आघाडी –
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागले होते. कारण, पवार घरण्यातील दोन उमेदवार मैदानात होते. अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे मैदानात होत्या. सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीच्या कलामध्ये आघाडी घेतली होती. पण सुप्रिया सुळे यांनी त्यानंतर जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली. सुप्रिया सुळे चौथ्या फेरीनंतर यांनी तब्बल 19 हजार मतांची आघाडी घेतली आहे.
महाराष्ट्र्रात महाविकास आघाडीने मारली मुसंडी
शिरुरमध्ये तुतारी वाजली –
पाचव्या फेरी अखेर शिरुरमधुन अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. 25088 मतांनी अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.
बीडमध्ये पंकजा मुंडेंना झटका –
तब्बल 8 हजार मतांची बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरीनंतर पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जातोय.
सातारा
सातऱ्यात शशिकांत शिंदेंनी मोठी आघाडी घेतली आहे. उदयनराजे भोसले यांना मोठा झटका बसला आहे.
दिंडोरी –
चौथी फेरीअखेर भास्कर भगरे 6989 मतांनी पुढे आहेत. मंत्री भारती पवार पिछाडीवर आहेत.
माढा –
भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
रावेर
रावेरमधून राष्ट्रवादी एस पी श्रीराम पाटील यांनी दहा वाजेपर्यंत आघाडी घेतली होती. रावेरमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
भिवंडी –
राज्यमंत्री कपिल पाटील यांना भिवंडीमध्ये जोरदार धक्का बसला आहे. बाळ्यामामा म्हात्रे यांनी मोठी आघाडी घेतली आहे
वर्धा –
वर्ध्यामधून 11 वाजेपर्यंत अमर काळे आघाडीवर आहेत.
अहमदनगर दक्षिण –
भाजपचे सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. निलेश लंके यांनी 11 वाजेपर्यंतच्या कलामध्ये मोठी आघाडी घेतली आहे.
महाविकास आघाडीची मुसंडी –
महाविकास आघाडीने राज्यातील 48 जागांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांना मोठी आघाडी मिळाली आहे. ठाकरेंचे 8, शरद पवारांचे 10 आणि काँग्रेसचे 10 उमेदवार आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे 28 उमेदवार आघाडीवर आहेत. तर महायुतीला 19 जागांवर आघाडी आहे. एक अपक्ष सध्या आघाडीवर आहे.