लोकसभा निवडणूक 2024 ची (Lok Sabha Election) मतदान प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण झाली. 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. आज 4 जून रोजी मतमोजणीला सुरूवात होणार आहे. देशात सर्वच ठिकाणी निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील 48 मतदार संघातही मतमोजणीला सुरवात झाली आहे.
ठाणे-कोकण मतदारसंघात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आता भिवंडी लोकसभा निवडणूक मध्ये भिवंडीमध्ये तिरंगी लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre ) हे आघाडीवर आहेत. सुरेश म्हात्रे हे 6,941 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे कपिल पाटील हे त्यांच्याविरोधात उभे आहेत.
नाशिक, जळगाव, नंदूरबार अन् धुळ्यात कुणाची आघाडी?
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यांत भिवंडी लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडलं. महाराष्ट्रातील दिग्गज लढतींपैकी एक लढत म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे आणि भाजपचे कपिल पाटील यांच्यातील लढत आहे.