19.7 C
New York

Prajwal Revanna : कर्नाटकातून प्रज्ज्वल रेवण्णांचा पराभव

Published:

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) मतमोजणी सुरू असतानाच कर्नाटकातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रज्ज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांचा पराभव झाला आहे. हसन मतदार संघातून पराभव त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. रेवण्णा यांच्यावर अनेक महिलांनी बलात्काराचे आरोप केले होते. येथून काँग्रेसचे उमेदवार श्रेयस पटेल (Shreyas Patel) विजय झाले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत प्रज्वल रेवण्णाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. भाजप नेत्यांनाही या मुद्द्यावरुन प्रचाराला सामोरे जाताना अडचण आल्याचं दिसून आलं. कर्नाटकसह देशभरात प्रज्ज्वल रेवण्णाच्या मुद्द्यावरुन रणकंदन घडलं होतं. आता, निवडणूक निकालात जनतेनं नाकारल्याचं दिसून येत आहे. दुपारी 12.45 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार प्रज्वल रेवण्णा यास 4 लाख 91 हजार 067 मत मिळाली आहेत. तर, काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल यांना 5 लाख 14 हजार 485 मतं मिळाली आहे. त्यामुळे, सध्या 23,418 मतांसह पटेल आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार प्रज्ज्वल रेवण्णाचा पराभव झाल्याची माहिती आहे.  

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img