21 C
New York

Sharad Pawar : भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी पवारांच्या हालचाली

Published:

लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) कल आता स्पष्ट झाले. सध्या देशात भाजपप्रणित एनडीए आघाडीवर असून त्यापाठोपाठ इंडिया आघाडीच्या (India Alliance) जागा आल्या आहेत. एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करू शकते. मात्र, भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी शरद पवारांनी हालचाली वाढवल्या आहेत. शरद पवारांनी (Sharad Pawar) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी आतापर्यंतचा कल हा परिवर्तनाला पोषक असून उद्या दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती दिली.

आज माध्यमांशी बोलतांना शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय कष्ट घेतले. त्याबद्दल संघटनेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचा आतापर्यंतच कल परिवर्तनाला पोषक आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही दहा जागा लढल्या. मात्र, सात जागांवर आम्ही आघाडीवर आहोत. हे आमच्या एकट्याचं य़श नाही, तर हे महाविकास आघाडीचं यश आहे. आमच्यासोबत आमच्या मित्रपक्षांनीही यश मिळवलं आहे. हे सगळं यश कॉंग्रेस, उद्धव ठाकरे आणि आमच्या कार्यकर्त्याचं आहे, असं पवार म्हणाले.

अजितदादांना पुन्हा पक्षात घेणार का? पवार म्हणाले

पुढं बोलतांना ते म्हणाले की, आज मी इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सिताराम येचुरींसह अन्य लोकांशी चर्चा केली. उद्या आमची बैठक होण्याची शक्यता आहे. आम्ही एकत्रित राहू. उद्याचं बैठकीत आम्ही धोरणं ठरवू. उद्याची बैठक ही दिल्लीला होऊ शकतो, असंही पवार म्हणाले.

Sharad Pawar युपीत भाजपला मर्यादित जागा – पवार

उत्तरप्रदेशमध्ये फारच वेगळा निकाल लागला आहे. या निकालाचं एक वैशिष्ट असं की, यापूर्वी भाजपला युपीमध्ये जे यश मिळायंच, त्याची मार्जिन फार असायचं. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपला फारच मर्यादित जागा मिळत असल्याचं पवार म्हणाले

Sharad Pawar चंद्रबाबूंशी बोललो नाही – पवार

शरद पवारांची नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंशी फोनद्वारे चर्चा झााल्याचं वृत्त आहे. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, मी चंद्रबाबूंशी बोललो नाही. माझं बोलणं खर्गे आणि सिताराम येच्युरी यांच्याशी झाल असल्याचं पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img