संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात (Thane Loksabha Election) पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला वर्चस्व सिद्ध करत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का दिला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी 80,000 मतांची राजन विचारेंचा (Rajan Vikhare) पराभव केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघात संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून आपले विश्वासू नरेश म्हस्के यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते मात्र भाजपकडून नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. यामुळे ठाणेमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला वर्चस्व राखणार का? याबाबात अनेक चर्चांना उधाण आले होते.
भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी पवारांच्या हालचाली
मात्र आज जाहीर झालेल्या निकालात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी आपला वर्चस्व सिद्ध करत ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. पाचव्या टप्प्यात म्हणजेच 20 मे रोजी झालेल्या मतदानात ठाणे लोकसभा मतदारसंघात 52.09 टक्के मतदान झाले होते. त्यांमध्ये पुरुष मतदारांची संख्या 53.22 टक्के तर महिला मतदारांची संख्या 50.79 टक्के आणि इतर मतदारांची संख्या 17.39 टक्के होती.