लोकसभा निवडणुकीची मतमोजणी (LokSabha Election) सुरू असून देशात सर्वत्र विरोधकांची इंडिया आघाडी भाजपप्रणित एनडीए आघाडीला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी भाजपला जोरदार धक्का देताना दिसत आहे. त्यात मुंबईमधील ( Mumbai ) 6 मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीत मिश्र असा कौल दिसत आहे.
LokSabha Election कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? जाणून घ्या…
मुंबईमध्ये लोकसभेचे 6 मतदारसंघ आहेत. त्यामध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार दक्षिण मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आघाडीवर आहेत. या ठिकाणी शिंदेंच्या सेनेच्या यामिनी जाधव पिछाडीवर आहेत. दक्षिण-मध्यमध्ये महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई आघाडीवर आहेत. या ठिकाणी शिंदेंच्या सेनेचे राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत.
उत्तर-मध्य मुंबईमध्ये महायुतीतील भाजपचे उज्ज्वल निकम आघाडीवर आहेत. या ठिकाणी कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड पिछाडीवर आहेत. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिंदेंच्या सेनेचे रविंद्र वायकर आघाडीवर आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर पिछाडीवर आहेत. उत्तर-पूर्व मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार संजय पाटील आघाडीवर आहेत. या ठिकाणी भाजपचे महिर कोटेचा पिछाडीवर आहेत. उत्तर मुंबईमध्ये महायुतीतील भाजपचे पियूष गोयल आघाडीवर आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कॉंग्रेसचे भूषण पाटील पिछाडीवर आहेत.
मोदींचा निरोप समारंभ सुरू झाला, राऊतांचं वक्तव्य
दक्षिण मुंबई :
अरविंद सावंत, ठाकरे गट – 95636
यामिनी जाधव, शिवसेना -62546
अफजल दाऊदानी, वंचित – 858
दक्षिण-मध्य मुंबई :
राहुल शेवाळे, शिवसेना – 126618
अनिल देसाई, ठाकरे गट – 149701
अबुल खान, वंचित – 7013
उत्तर-मध्य मुंबई
उज्वल निकम, भाजप – 159621
वर्षा गायकवाड, कॉंग्रेस – 117093
संतोष अंबुलगे, वंचित – 3281
उत्तर पश्चिम मुंबई :
अमोल कीर्तीकर, ठाकरे गट – 107077
रवींद्र वायकर, शिवसेना – 109170
परमेश्वर रणशूर, वंचित – 4306
उत्तर-पूर्व मुंबई :
मिहीर कोटेचा, भाजप – 136956
संजय पाटील, ठाकरे गट – 140749
दौलत खान, वंचित – 2605
उत्तर मुंबई :
पियूष गोयल, भाजप – 137248
भूषण पाटील, काँग्रेस – 67177
सोनल गोंदणे, वंचित – 1331