आज तारीख आहे 4/6/2024. देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा निर्णय (Loksabha Result) जाहीर होणार असल्याने या तारखेला खूप महत्व आहे. अंकशास्त्राच्या (Numerology) अनुषंगाने चार या मूलांकावरून आपण वर्तमान स्थिती पाहणार आहोत.
तर चार अंकाच्या स्पंदनाविषयी जाणून घेऊया. व्यक्ती राहु ग्रहाच्या अंमलात येतात. चार या अंकाच्या व्यक्ती अतिशय स्पष्ट बोलणाऱ्या असतात, जन्मतारखेत चार हा अंक एक किंवा दोन वेळा येणं शुभ असतं, तीन किंवा चार वेळा येणारा अंक त्रासदायक ठरतो. या व्यक्ति रुढी परंपरांना फारसे महत्त्व देत नाहीत. जिद्दीने कोणतेही काम पूर्ण करण्याची त्यांची तयारी असते. या व्यक्ती वेगळ्या पद्धतीने विचार करून संशोधक वृत्तीने नेतृत्व करतात. यांना खोटेपणाने वागणाऱ्या लोकांची चीड असते. यांनी मनात आणले तर कोणत्याही व्यक्तीच्या मदतीसाठी तयार राहून त्याला शेवटपर्यंत साथ देतात. विशेषतः कनिष्ठ लोकांच्या न्यायासाठी निर्भयपणे साथ देतात. आयुष्यात यांना कुठलेही बंधन आवडत नाही, ते अंतस्फूर्तीने, प्रभावशील वाणीने परिस्थिती हाताळू शकतात, हे उत्तम कलाकार असतात.
Loksabha Result : निकालानंतर महत्त्वाच्या पक्षात बंडखोरी
परंतु, यांच्या अति स्पष्टवक्तेपणामुळे व परखड वृत्तीमुळे या व्यक्तीना विरोध सहन करावा लागतो. या त्यांच्या अवगुणांमुळे यांना मित्र कमी, शत्रू जास्त निर्माण होतात. यांच्या स्वभावात तापटपणा असल्याने ते कुणाकडूनही अपमान सहन करू शकत नाहीत. स्वभावाने अस्थिर असतात. मनात बदल्याची भावना ठेवून स्वतःच्या म्हणण्यावर अडून राहण्याचा स्वभाव असतो. या व्यक्ती सतत कामात गुंतून राहतात. यांचे कुटूंबातील सदस्यांसोबत स्वतःच्या मनाप्रमाणे राहावयाचे असल्याने वादविवाद होत असतात. यांना समजून घेणे अवघड असते.
या निकालाच्या बाबतीत काही गूढ गोष्टी घडण्याची शक्यता आहे, आजच्या निकालाच्या तारखेत चार हा अंक दोन वेळा आल्याने राहू ग्रहाच्या गुणधर्मात वाढ झाल्याने जाहीर होणारा निकाल कसा असेल? हे पाहुया. निकाल लागल्यानंतर महत्त्वाच्या पक्षात बंडखोरी दिसून येईल. अत्यंत कठोर निर्णय लागण्याची शक्यता आहे. राजकिय उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःवर संयम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे; अन्यथा हाताबाहेर जाणाऱ्या गोष्टी घडू शकतात. काही व्यक्तींचे स्वार्थापोटी पक्ष बदलण्याचे संकेत दिसून येतात, आजच्या निकालावरून कायदा व नियम पाळले नाहीत तर येणाऱ्या पाच वर्षात राजकारणी लोकांनी अहंभावी व मनमानी स्वभावात परिवर्तन न केल्यास कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता दिसून येते.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंना मुंबईचा बालेकिल्ला राखण्यात यश
Loksabha Result : पुढील पाच वर्षे प्रामाणिकपणे कार्य पार पाडावे लागेल
हा निकाल जून या सहाव्या महिन्यात लागत असल्याने अनेक पैशाच्या देवाणघेवाणात काही चुकिचे व्यवहार होण्याची शक्यता आहे. अतिविलासी राहणीमानामुळे आर्थिक अडचणी दिसून येण्याची शक्यता आहे. दिखाऊपणामुळे वैयक्तिक दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. कारण चार (राहू) व सहा (शुक्र) हे अंक एकत्र येणे शुभ नसते. या वेळी 2024 हे वर्ष असल्याने त्याचा मूळ अंक हा आठ येतो, या अंकावर शनि या ग्रहाचा अंमल असतो.
येणाऱ्या पुढील पाच वर्षात प्रत्येक पक्षाला प्रामाणिकपणे परिश्रमाने, सातत्याने, चिकाटीने राजकीय कार्य पार पाडावे लागेल; अन्यथा गर्विष्ठपणा, निराशावादी पणामुळे कार्यात विलंब होउन नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण शनि हे न्यायाधीश असल्याने ते योग्य कार्याला न्याय देतील व चुकिचे कार्य करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांनी सेवाभावपणाने कार्य न केल्यास त्यांच्या कार्यात अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता दिसून येते. अनेकांच्या प्रतिष्ठेला शनि महाराज त्या नुसार न्याय देतील.
आजच्या निर्णयाच्या तारखेचा विस्तार.
4+6+2+0+2+4=18.
1+8 = 9
तारखेची बेरीज 18 येते, बेरीज 1 व 8 रवी व शनी पिता-पुत्र हे एकमेकांचे विरोधक आहेत. त्याचा एकम अंक 9 हा येतो. मुलांक 4 व भाग्यांक 9 या नुसार आजची तारीख निकालासाठी निश्चित केलेली चांगली नाही. त्याच्यासोबत चंद्र व शुक्र आजच्या तारखेत येणे शुभ नाही. 4 व 9 एकमेकाचे शत्रू अंक, 4 व 2 शत्रू अंक. 6 व 9 शत्रू अंक. कारण आजच्या तारखेत सुर्याचा 1 अंक, गुरुचा 3 हा अंक, बुधाचा 5 अंक, अध्यात्मिक केतुचा 7 हा अंक व शनिचा कर्मवादी 8 अंक हे सर्व ग्रह आजच्या तारखेत अंकशास्त्रानुसार गहाळ असल्याचे दिसून येते, येणाऱ्या विधानसभेच्या निकालासाठी योग्य तारीख व दिवस पाहून ठरविणे योग्य ठरेल. अन्यथा, पुढील पाच वर्षे राज्यातील जनतेला जो संघर्ष आता पर्यंत सहन करावा लागला, तसाच त्रास यापुढेही जनतेला सहन करावा लागेल, उद्यापासून अनेक वस्तूंच्या भावात वाढ झालेली दिसून येईल.
राज्यकर्ते व विरोधक सध्याच्या राजकारणात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर, त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्याचे सोडून एकमेकांना जे अपशब्द, गलिच्छ भाषेचा वापर करून त्यांच्या वैयक्तिक गोष्टींवर चिखलफेक करण्यात दिवस घालवतात हे प्रसारमाध्यमांद्वारे जनतेला दिसूत येत आहे. यापुढे देखिल हे राजकारण असेच चालू राहिले तर आजच्या निकालात राहु आपला प्रभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही.
अमरनाथ परब 9833606655