23.1 C
New York

Loksabha Elections : महाराष्ट्र्रात महाविकास आघाडीने मारली मुसंडी

Published:

मुंबई

देशातील 18 व्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Elections) मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. एक्झिट पोल नुसार देण्यात आलेला मतमोजणीमध्ये विपरीत दिसून येत आहे. भाजप प्रणिती एनडीएला (NDA) 289 तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी (India Alliance) 236 जागेवर आघाडीवर आहे. मात्र या निवडणुकीमध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाने या निवडणुकीत 10 जागेवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 8 जागेवर सध्या शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे शांतीत क्रांती शरद पवारांनी केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये 10 जागांवर निवडणूक लढवली होती, त्या दहाही जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. अजित पवारांनी फारकत घेतल्यानंतर शरद पवार यांनी नव्या जोमानं पक्ष बांधणी केली. दिवसरात्र प्रचार करत लोकसभेत मोठं यश मिळावलं आहे. 11 वाजेपर्यंतच्या कलामध्ये 8 जागांवरील सर्व उमेदवार आघाडीवर आहेत. दिंडोरीमध्ये राज्यमंत्री भारती पवार आणि भिवंडीमधील राज्यमंत्री कपिल पाटील यांना झटका बसलाय. सुरुवातीच्या कलामध्ये हे दोन्ही उमेदवार पिछाडीवर असून शरद पवार यांचे उमेदवार

बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंची मोठी आघाडीवर
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागले होते. कारण, पवार घरण्यातील दोन उमेदवार मैदानात होते. शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवार मैदानात होत्या. सुरुवातीच्या कलामध्ये सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली. चौथ्या फेरीनंतर सुप्रिया सुळे यांनी तब्बल 19 हजार मतांची आघाडी घेतली आहे.

शिरुरमध्ये मोल कोल्हे आघाडीवर
पाचव्या फेरी अखेर शिरुरमधुन अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे यांनी 25088 मतांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.

बीडमध्ये बजरंग सोनवणे आघाडीवर

बजरंग सोनवणे यांनी तब्बल 8 हजार मतांची आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरीनंतर पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जातोय.

सातारामध्ये शशिकांत शिंदें आघाडीवर

सातऱ्यात शशिकांत शिंदेंनी मोठी आघाडी घेतली आहे. उदयनराजे भोसले यांना मोठा झटका बसला आहे.

दिंडोरीमध्ये भास्कर भगरे आघाडीवर

चौथी फेरीअखेर भास्कर भगरे 6989 मतांनी पुढे आहेत. मंत्री भारती पवार पिछाडीवर आहेत.

माढामध्ये धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर

भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

रावेरमध्ये एस पी श्रीराम पाटील आघाडीवर

रावेरमधून राष्ट्रवादी एस पी श्रीराम पाटील यांनी दहा वाजेपर्यंत आघाडी घेतली होती. रावेरमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

भिवंडीमध्ये बाळ्यामामा म्हात्रे आघाडीवर

भिवंडीमध्ये राज्यमंत्री कपिल पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. बाळ्यामामा म्हात्रे यांनी मोठी आघाडी घेतली आहे

वर्धामध्ये अमर काळे आघाडीवर

वर्ध्यामधून 11 वाजेपर्यंत अमर काळे आघाडीवर आहेत.

अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंके आघाडीवर

भाजपचे सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. निलेश लंके यांनी 11 वाजेपर्यंतच्या कलामध्ये मोठी आघाडी घेतली आहे.

महाविकास आघाडीची मुसंडी

राज्यातील 48 जागांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांना मोठी आघाडी मिळाली आहे. ठाकरेंचे 12, शरद पवारांचे 8 आणि काँग्रेसचे 11 उमेदवार आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे 31 उमेदवार आघाडीवर आहेत. तर महायुतीला 16 जागांवर आघाडी आहे. एक अपक्ष सध्या आघाडीवर आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img