23.1 C
New York

Loksabha Elections : राज्यात ‘मविआ’ची जोरदार मुसंडी

Published:

मुंबई

देशातील लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Elections) निकाल आज समोर येत आहेत. लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिलेला भारतीय जनता पक्ष हॅट्रिक साधणार की इंडिया आघाडी धक्का देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता मतमोजणीला सुरूवात होऊन पहिला कल समोर आला आहे.

देशातील ५४३ लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सध्या समोर येत आहेत. मतमोजणीला सुरूवात होताच भारतीय जनता पक्षाची एनडीएने316 ठिकाणी आघाडी घेतली आहे इंडिया आघाडीने 185 जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच वायनाडमधून राहुल गांधी, तर कन्नौजमधून अखिलेश यादव आघाडीवर आहेत.

राज्यात महाविकास आघाडीने सुरूवातीला बाजी मारली असून बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, शिरुरमध्ये अमोल कोल्हे, पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ तर दिंडोरीमधू भास्कर भगरे आघाडीवर आहेत. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार अनेक ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतली आहे. राज्यात महाविकास आघाडी 25 तर महायुतीचे 23 उमेदवार आघाडीवर आहे.

दरम्यान, नागपुरमध्ये पहिल्या फेरीत नितीन गडकरींनी आघाडी घेतली आहे. तर जालन्यामध्ये मंत्री रावसाहेब दानवे यांनी पोस्टल मतमोजणीत सरशी झाल्याचे दिसत आहे. कल्याण लोकसभेत पोस्टल मतदानात श्रिकांत शिंदे पुढे आहेत. तर सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img