भारतीय जनता पक्षासाठी (BJP) लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) निकाल धक्कादायक राहिला. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आलेल्या वादळात भाजपची विकास कामे उडली. काही महिन्यांपूर्वी जगभर ज्या अयोध्याच्या गवगवा झाला, अयोध्यामधील विकासाचे कौतूक झाले, भव्य श्रीराम मंदिर उभारले गेले, भाजपचा त्याच ठिकाणी पराभव झाला. समाजवादी पक्षाचा फैजाबाद लोकसभा मतदार संघात विजय झाला. भाजपचा रामाच्या भूमीत रामाच्या नावामुळे वाढलेल्या पराभव झाला. फैजाबाद भाजपचे अनेक वर्ष खासदार असलेले लल्लू सिंह पराभूत यांचा पराभव झाला. त्या ठिकाणी समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांचा विजय झाला. अशातच बॉलिवूडचा गायक सोनू निगमने (Sonu Nigam) अयोध्यावासियांविषयी एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम चांगलेच भडकले. हे लज्जास्पद… या शब्दांत सोनू निगम यांने आपल्या भावाना व्यक्त केल्या.
काय म्हणाले सोनू निगम
अयोध्या राम मंदिरासारख्या मोठ्या मुद्द्यावरूनही भाजपला अयोध्येत विजयासाठी जोरदार प्रयत्न करावे लागत आहेत, अशा परिस्थितीत बॉलिवूड गायक सोनू निगमने एक्स (ट्विटर) वर अयोध्येतील लोकांसाठी एक संतप्त पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने अयोध्येतील जनतेबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. सोनू निगम हा स्पष्टवक्ता गायक आहे. तो नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर मत मांडताना दिसतो. तसेच अनेकदा तो पंतप्रधान मोदींना पाठींबाही देतो.सोने निगम यांनी अयोध्यातील जनतेला चांगलेच फटकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्या सरकारने संपूर्ण अयोध्याला बदलून दिले. विकासाची गंगा त्या ठिकाणी आणली. अयोध्येला चमकवले. नवीन विमानतळ दिले. जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन दिले. इकोनॉमी झोन बनवले. त्या ठिकाणी भाजपचा उमेदवाराचा पराभव झाला. हे लज्जास्पद आहे अयोध्यावासियो…
प्रसिद्ध बॉलीवूड गायक सोनू निगमने राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यात सहभाग घेतला होता. त्यानं या कार्यक्रमात भजन गाऊन रामलल्लाची सेवा केली होती.सोनू निगमने मंदिर बांधल्याबद्दल भाजप सरकार आणि नरेंद्र मोदींच कौतुक केलं होतं. सोनू निगम म्हणाला होता की, “प्रभू श्री रामची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत येऊन मी भारावून गेलो आहे. अयोध्या हे भारताचं हृदय आहे. अयोध्येतील राम मंदिराची निर्मिती ही भारताच्या प्रतिष्ठेची बाब आहे, राम मंदिर सर्वांना एकत्र आणण्याचं काम करेल.’’ अशा भावना त्यानं व्यक्त केल्या होत्या. आता त्यानं आज अयोध्येतील लोकांना सुनावलं आहे.