मुंबई
देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) मतगणना सुरू आहे. भाजपच्या (BJP) वतीने 400 पार जाणारा निवडणुकीपूर्वी दिला होता. अनेक एक्झिट पोल मध्ये पुन्हा देशात मोदी सरकार येईल असे भाकित देखील वर्तुण्यात आले होते. मात्र भाजपला अद्याप एनडीए मिळून 289 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर मोदी सरकारमधील 10 दिग्गज मंत्री पिछाडीवर आहे. त्यामुळे भाजपच्या 400 पारला ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एनडीए सध्या 289 जागांवर पुढे आहे. इंडिया आघाडी 230 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 21 जागांवर आघाडीवर आहेत. सध्या एकट्या भाजपबद्दल बोलायचे झाले तर ते 239 जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत एकट्या भाजपला बहुमत मिळणे कठीण आहे.
‘400 पार’ला लागलं ग्रहण! भाजपाचे 10 दिग्गज पिछाडीवर, ज्यामध्ये 7 मंत्री लोकसभा निवडणुकीची 2024 ची मतमोजणी सुरू होऊन साडेतीन तासांहून अधिक काळ लोटला आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार अमेठीमधून काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा 29 हजार मतांनी आघाडीवर आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अजूनही मागे आहेत.
यूपीमधील मोदी सरकारचे सहा मंत्री सध्या टीम इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या मागे आहेत. महेंद्र नाथ पांडे, स्मृती इराणी, कौशल किशोर, अनुप्रिया पटेल, अजय मिश्रा पिछाडीवर आहेत. हरियाणात रणजीत चौटाला, बंटो कटारिया, अभय सिंह चौटाला आणि नयना चौटाला यांच्या जागा अडकल्याचं दिसत आहे.त्याचवेळी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर पंजाबमधील पटियाला मतदारसंघावर पिछाडीवर आहेत.