भाजपकडून (BJP) हिमाचल प्रदेशातील मंडी (Himachal Pradesh Mandi) लोकसभा मतदार संघातून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने निवडणूक लढवली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये काय होणार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मंडीमध्ये एकीकडे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत होती. तर दुसरीकडे तिच्या विरोधात माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह (Virbhadra Singh) आणि सध्याच्या खासदार प्रतिभा सिंह (Pratibha Singh) यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 1 जून 2024 रोजी ही निवडणूक पार पडली.
काँग्रेस (Congress) आणि भाजपामध्ये (BJP) हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये नेहमीच चुरशीची लढत पाहायला मिळते. आता या दोन्ही पक्षांतील दोन तरुण चेहरे यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरले. बॉलिवूडमध्ये कंगना रनौत गेल्या एका दशकापासून हिंदुत्वाचा प्रचार करताना दिसून आली. त्यामुळे ‘पंगाक्वीन’ अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. तर दुसरीकडे विक्रमादित्य सिंह हाडाचा राजकारणी आहे. तर दुसरीकडे विक्रमादित्य सिंह यांचे आई-वडील दोघेही हिमाचल प्रदेशातील राजकारणात सक्रीय आहेत.
Kangana Ranaut मंडी लोकसभा निवडणुकीचा इतिहास काय?
राजघराण्यांचा अनेकदा मंडी लोकसभा निवडणुकीत दबदबा दिसून आला आहे. आतापर्यंत 19 वेळा झालेल्या निवडणुकीत 13 वेळा राजघराण्यांतील नेते संसदेत पोहोचले आहेत. तर फक्त सहा वेळा सर्वसामान्य कुटुंबातील नेत्यांनी बाजी मारली आहे. 1952 मध्ये झालेल्या निवडणुकीत देशातील पहिल्या आरोग्य मंत्री अमृतकौर होत्या. अमृतकौर या पटियाला घराण्यातील आहेत.
कंगना रनौत आपला प्रचारादरम्यान काँग्रेसवर निशाणा साधला होता. दरम्यान ‘पंगाक्वीन’ने आपल्या विरोधात असलेल्या विक्रमादित्य सिंह यांच्याबद्दल काही वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे अभिनेत्री अडचणीतदेखील आली. कंगना आणि विक्रमादित्य यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे शेवटपर्यंत सुरू होते. कंगना बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असल्याने प्रचारादरम्यान तिला चांगलाच फायदा झाला. मंडी लोकसभा मतदार संघात मंडी, कुल्लू, लाहौल स्पीती, किन्नौर, शिमला आणि चंबा जिल्ह्यातील 17 विधानसभा मतदार संघ येतात. कंगनाने आपल्या प्रचार फेरीत आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा अशा विविध मुद्द्यांना हात घातला होता. निवडणूक जिंकले जर बॉलिवूड सोडेल, असं करिअरसंदर्भात मोठं वक्तव्य कंगनाने प्रचारादरम्यान केलं.