3.6 C
New York

Election Commission : पराभूत उमेदवारांना मिळणार ‘हा’ अधिकार

Published:

एकीकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission ) पराभूत उमेदवारांसाठी ( losing candidate ) एक योजना आणली आहे. यानुसार आता पराभूत उमेदवार ईव्हीएम मशीनमधील मायक्रो चीप तपासू शकणार आहेत. दरम्यान पराभूत झाल्यानंतर त्या पराभूत उमेदवारांकडून नेहमीच ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला जातो. त्यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाने पराभूत उमेदवारांना ईव्हीएम मशीन तपासण्याची सोय केली आहे. त्यासाठी संबंधित उमेदवाराला मतमोजणीनंतर सात दिवसाच्या आत इव्हीएम तपासणीसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र यासाठी उमेदवाराला चाळीस हजार रुपये भरावे लागणार आहेत.

निवडणूक आयोगाकडून नुकत्याच या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. हा निर्णय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारघेतला आहे. निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर त्यानुसार दुसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवाराला सात दिवसाच्या आत निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर करावा लागेल. तसेच पराभूत उमेदवाराला देशामध्ये अशा प्रकारचा अधिकार पहिल्यांदाच मिळाला आहे.

देशात काटे की टक्कर! एनडीए 275 तर इंडिया आघाडी ‘इतक्या’ जागांवर पुढे

दुसरीकडे देशासह राज्यात लोकसभेची निवडणुक ( Lok Sabha Election ) पार पडली. त्यानंतर आथता सर्वांचं लक्ष लागलं आहे. ते उद्या 4 जूनला लागणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रशासनाकडून मतमोजणीची अंतिम तयार झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img