लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) मतमोजणी सुरू होऊन सुमारे दीड तास उलटला आहे. वाराणसीत सुरूवातीच्या कलांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) तब्बल सहा मतांनी पिछाडीवर होते. मात्र, आता मोदी भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत नरेंद्र मोदींना 36424 मते मिळाली असून ते 619 मतांनी आघाडीवर आहेत.
नरेंद्र मोदी हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. गेल्या 10 वर्षात देशाचे नेतृत्व करत असताना नरेंद्र मोदींनी वाराणसी हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ म्हणून निवडला होता. त्यामुळे वाराणसी हा अत्यंत महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ मानला जातो. दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर मोदी हे पिछाडीवर गेले होते. मात्र, मोदींना 36424 मते मिळाली असून ते 619 मतांनी आघाडीवर आहेत. तर कॉंग्रेसचे अजय रॉय यांनी 35805 मते मिळाली असून ते 619 मतांनी पिछाडीवर आहेत. बहुजन समाज पार्टीचे अहेर जमल लारी यांना 3679 मते मिळाली असून ते तब्बल 32745 मतांनी पिछाडीवर आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या कलांनुसार, एनडीए सध्या 291 जागांनी पुढे आहे. भाजप 242 जागांवर, टीडीपी 17 आणि जेडीयू 13 जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी 210 जागांसह पुढे आहे. यामध्ये काँग्रेस 91, सपा 29 आणि टीएमसी 22 जागांवर आघाडीवर आहे.