23.1 C
New York

Western Railway : तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे लोकल विस्कळीत

Published:

पश्चिम रेल्वेवर (Western Railway) उपनगरीय रेल्वेसेवा उशिरानं धावत आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस. अशातच पश्चिम रेल्वेनं ऑफस गाठण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पोहोचलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.मुंबईच्या लोकल सेवेमागील शुल्ककाष्ठ काही संपण्याची चिन्हे दिसत नाही. आज सकाळी बोरिवली रेल्वे स्थानकावर केबल तुटल्याने पश्चिम रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे येथील अनेक लोकल या उशिराने धावत आहेत. तर बोरिवली स्थानकात केबलमध्ये बिघाड झाल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरून सोडण्यात येणाऱ्या उपनगरीय गाड्या स्थानकातच थांबल्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले आहे.

या बिघाडामुळे अनेक लोकल गाड्या या मध्येच थांबून असल्याची माहिती आहे. बोरिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरून केबल तुटल्याने काही ट्रॅक चेंजिंग पॉईंट बंद पडल्याने उपनगरीय गाड्या रोखण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली. स्थानकातील उर्वरित प्लॅटफॉर्म ३ ते ८ वरून गाड्या चालविल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेने सांगितले की, तुटलेल्या केबलची दुरुती तातडीने हाती घेण्यात आली आहे. या ठिकाणी संचारबंदी करण्यात येत असून लोकलसेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्राधान्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे दक्षिण मुंबईतील चर्चगेट ते शेजारच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू दरम्यान पसरलेल्या पश्चिम रेल्वेवर दररोज १३०० हून अधिक उपनगरीय सेवा चालवल्या जातात आणि सुमारे ३० लाख प्रवासी या नेटवर्कवर प्रवास करतात.

बिश्नोई गँगचा पुन्हा सलमान खानवर हल्ल्याचा कट

Western Railway आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप; अनेक नागरिक अडकून पडले

मुंबईत रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे आधीच नागरिक वैतागले होते. हा मेगा ब्लॉक रविवारी पुर्ववत करण्यात आला. दरम्यान, आज सकाळी बोरिवली येथे केबल तुटल्याने वेस्टर्नरेल्वेची सेवा विस्कळीत झाली. अनेक लोकल गाड्या या बोरिवली स्थानकातच थांबवण्यात आल्या आहेत. यामुळे कामासाठी निघालेल्या अनेक प्रवासी, कर्मचारी हे गाड्यांमध्ये अडकून पडले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना कामावर जाण्यास विलंब झाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img