3.8 C
New York

Lok Sabha elections : लोकसभेच्या निकालापूर्वीच विखे कुटुंबीय देवदर्शनासाठी

Published:

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections)निकालाचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. मंगळवारी म्हणजेच चार जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान नगर दक्षिणेचे लोकसभेचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या विजयासाठी त्यांचे वडील – मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) हे पंढरपुरातील विठ्ठल चरणी लीन झालेत. निकालापूर्वीच विखे कुटुंबियांनी देवदर्शनचा सपाटा सुरु केला आहे. आज सकाळी मंत्री विखे पाटील हे आपल्या कुटुंबासह हेलिकॉप्टरने विठ्ठल दर्शनासाठी आले होते. येथूनच ते तुळजापूरकडे रवाना झाले. दरम्यान, विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना मंत्री विखेंनी सुजय विखे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

राज्यात चुरशीच्या सामन्यात नगर दक्षिण लोकसभा निवडणूक देखील आहे. यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नगर दक्षिणेतून महाविकास आघाडीकडून निलेश लंके हे उमेदवार आहेत. तर महायुतीकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांना संधी देण्यात आली होती. सुरुवातीपासूनच या मतदारसंघामध्ये चुरस पाहायला मिळाली. नगर दक्षिणेमध्ये लंके यांच्या आडून शरद पवार हे स्वतःच विखे यांना शह देण्यासाठी रणनीती आखात होते. यामुळेच अजित पवार यांच्या गटातून त्यांनी लंके यांना आपल्याकडे खेचत सुजय विखे यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे खऱ्या अर्थाने या मतदार संघात विखे विरुद्ध पवार असाच सामना पाहायला मिळणार आहे.

निकालाच्या एक दिवस आधी PM मोदींची पोस्ट

Lok Sabha elections लंके विरुद्ध विखे

नगर दक्षिणेमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा थेट सामना होत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच एक्झिट पोलचे आकडेवारी समोर आली. यामध्ये नगरमध्ये लंके यांच्यासाठी अनुकूल वातावरण दाखवले असून लंके हे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे विखे कुटुंबीयांमध्ये कोठेतरी धाकधूक वाढल्याचे समजते आहे. यामुळे अत्यंत प्रतिष्टेची बनलेल्या या निवडणुकीमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे देखील सुरुवातीपासूनच चांगले सक्रिय होते. नगरचा जागा आमचीच असल्याचा दावा मंत्री विखे करत आहे. तर तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने मी निवडून येणार असा दावा लंके यांनी केला आहे.

Lok Sabha elections कोण होणार खासदार?

2019 च्या निवडणुकीमध्ये मोदी लाट असल्याने भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी अनुकूल वातावरण राहिले व त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या मोठ्या मताधिक्याने पराभव करत खासदारकी मिळवली. मात्र यंदाची निवडणूक वेगळी ठरू लागली आहे. राज्यात झालेल्या पक्षफुटीनंतर सत्ताधाऱ्यांसाठी कठीण तर विरोधकांची सहानुभूतीची लाट ही महत्वाची ठरणार असल्याचे चित्र आहे. भाजप विरोधात असलेले वातावरण शरद पवार यांच्या तुतारीसाठी अनुकूल राहिले आहे. यामुळे यंदाची निवडणूक ही विखेंसाठी खडतर बनल्याचे सध्या तरी बोलले जात आहे. यामुळे यंदा नगर दक्षिणेचा खासदार कोण बनणार? कोण विजयाचा गुलाल उधळणार? हे चार जूनला स्पष्ट होणार.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img