4 C
New York

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी फडणवीसांच्या जवळच्या नेत्याचा फोन?

Published:

संतोष मोरे, मुंबई

लोकसभा निवडणुकीची (Loksabha Elections) मतमोजणी उद्या (मंगळवारी) होणार आहे. पण, त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपमधील (BJP) अनेक नेत्यांनी एकमेकांवर टीका केली होती. मात्र, आता मतमोजणीच्या काही तासापूर्वी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय विश्वासू एका नेत्याने वेळ मागितली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राजकारणात कोणत्याही शक्यता नाकारता येत नसतात, त्यामुळे ठाकरे एनडीएत गेले तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

शिवसेना आणि भाजप यांची 30 वर्षाची युती 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर तुटली. त्यानंतर शिवसेनेने महाविकास आघाडीची स्थापना करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जात राज्यात सरकार स्थापन केले होते. तेव्हापासूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे यांच्यावर तेव्हापासूनच भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने टीका करण्यात येत होती. तसे 2021 मध्ये शिवसेनेत फूट पाडण्यात भाजपचा मोठा हात होता. त्यामुळे दुरावा आधीच वाढला होता.

लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमताचा आकडा मिळू शकला नाही तर भाजपकडून आतापासूनच जुने मित्र असलेल्या पक्षांकडे मैत्रीचा हात पुन्हा पुढे करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यात युतीत असलेल्या शिवसेनेसोबत पुन्हा युती करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळच्या एका नेत्याने मातोश्रीवर फोन करून उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे एनडीएत सामील होतील, असे वक्तव्य नुकतेच आमदार रवी राणा, दीपक केसरकर यांनी केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजप लोकसभेच्या मतमोजणीनंतर एकत्र येईल का, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपच्या अनेक नेत्यांकडून टीका करण्यात आली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नकली शिवसेना म्हणून संबोधित केले होते. पण, ठाकरेंच्या मदतीला मी केव्हाही धावून जाईन, असेही मोदी म्हणाले, होते. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण तेव्हापासूनच निर्माण झाले होते. पण, उद्धव ठाकरे यांनी प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांना प्रतिउत्तर देत, हा केवळ मतदारांचे लक्ष विचलित करण्याचा प्रकार असल्याचे ठाकरे म्हणाले. होते. त्यामुळे उद्धव ठाकरे खरंच पुन्हा भाजपसोबत जाणार का, ही उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img