19.7 C
New York

Lok Sabha Election : यंदा मोदींनी केला रेकोर्डब्रेक प्रचार

Published:

लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडली. (Lok Sabha Election) प्रचाराच्या तोफा थंडावल्या. १ जुनला शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. तर निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होईल.१६ मार्चला लोकसभा निवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केली. आचारसंहिता लागू झाली. निवडणूक प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाच्या बाजूने पूर्ण जोर लावला. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कंबर कसली होती. देशभरातील जवळपास सर्वच राज्यांचा मॅरेथॉन दौरा करत होते. देशभरातील सर्वच राज्यांचा मॅरेथॉन दौरा जवळपास करत होते. देशाच्या दक्षिणेकडून निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर सुरू झालेला त्यांचा प्रचार उत्तरेकडील पंजाबमधील होशियारपूरमध्ये संपला. इथं पंतप्रधान मोदींनी एका निवडणूक रॅलीला संबोधित करत प्रचाराची सांगता केली.

Lok Sabha Election १८० सभा आणि रोड शो

या निवडणुकीत भाजपसाठी पंतप्रधान मोदींची मेहनत स्पष्टपणे दिसून आली. एकीकडे राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांसारखे विरोधी पक्षाचे फायर ब्रँड नेते तर दुसरीकडे नरेंद्र मोदी हे संपूर्ण निवडणूक प्रचारात आपल्या उर्जेने सर्वांशी स्पर्धा करताना दिसले. आंध्र प्रदेशातील पलानाडू येथून निवडणूक प्रचाराची सुरुवात करून, पंतप्रधान मोदींनी ३० मेला पंजाबमधील होशियारपूरमध्ये प्रचाराचा समारोप केला. पंतप्रधान मोदींनी १८० रॅली आणि रोड शोया ७५ दिवसांच्या कालावधीत केलेत.

64 कोटी नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election ८० हून अधिक मुलाखती दिल्या

पंतप्रधान मोदींच्या रॅलींसह त्यांच्या रोड शो व इतर कार्यक्रमांमधील सहभागाची आकडेवारी समोर आलीये. आकडेवारी ही पाहिली तर ही संख्या २०६ इतकी. यासोबतच त्यांनी या काळात ८० हून अधिक मुलाखती मीडिया चॅनेल, वर्तमानपत्रे, यूट्यूबर्स आणि ऑनलाइन मीडियाला दिल्या. याचा अर्थ, पंतप्रधान मोदी दररोज सरासरी दोनपेक्षा जास्त रॅली आणि रोड शोमध्ये सहभागी झाले. त्याच वेळी, मार्चमध्ये निवडणुकांच्या घोषणेपूर्वी, पंतप्रधान मोदींनी १५ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान १५ सभा घेतल्या होत्या.

Lok Sabha Election यूपीमध्ये सर्वाधिक सभा

यूपीमध्ये पंतप्रधान मोदींनी सर्वाधिक २२ जाहीर सभा आणि एकूण ३१ प्रचार सभा घेतल्या. यासोबतच त्यांनी कर्नाटकात ११, तेलंगणात ११, तामिळनाडूत ७, आंध्र प्रदेशात ५ आणि केरळमध्ये ३ सभा घेतल्या. पश्चिम बंगालमध्ये २० रॅलींसह बिहारमध्ये २० सभांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं. महाराष्ट्रात १९ निवडणूक सभांना संबोधित केलं. यासोबतच पंतप्रधानांनी ओडिशा आणि मध्य प्रदेशमध्ये १० प्रचार सभांना संबोधित केलं. त्याच वेळी, पंतप्रधानांचे लक्ष झारखंडवरही होतं. इथं त्यांनी ७ ठिकाणी कार्यक्रम घेतले. पंतप्रधान मोदींच्या २०१९ च्या निवडणूक रॅलींची संख्या पाहिली तर एकुण जाहिर सभांची संख्या १४२ होती.

Lok Sabha Election कन्याकुमारी दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. मेच्या संध्याकाळपासून १ जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यान मंडपममध्ये ध्यान करण्याचं नियोजन त्यांनी केलंय. हे तेच ठिकाण आहे जिथं स्वामी विवेकानंदांनी एकदा ध्यान केलं होते. हे भारताचे दक्षिणेकडील टोक आहे. शिवाय, हे असे ठिकाण आहे जेथे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला मिळते. हे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांचे मिलन बिंदू इथं आहेत. कन्याकुमारी येथे जाऊन पंतप्रधान मोदी राष्ट्रीय एकात्मतेचे संकेत दिलेत. पंतप्रधान मोदी राष्ट्रीय एकात्मतेचे कन्याकुमारी येथे जाऊन संकेत दिलेत. पंतप्रधान आध्यात्मिक यात्रेसाठी निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटी ओळखले जातात. या क्रमाने ते ३० मे रोजी कन्याकुमारीला पोहोचतील आणि १ जूनपर्यंत तिथेच होतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img