21 C
New York

India Player : टीम इंडियाचा सुपर फिनिशरने केली निवृत्ती जाहीर

Published:

भारतीय क्रिकेट संघाचा मराठमोळा स्टार क्रिकेटर (India Player) केदार जाधवनं (Kedar Jadhav) मोठा निर्णय घेतला आहे. केदार जाधवनं महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni ) प्रमाणं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली आहे. केदार जाधवनं वयाच्या 39 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. केदार जाधवचा हा निर्णय क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारा ठरला आहे. केदारने आज अचानकपणे हा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे केदार जाधवने माजी कर्णधार एमएस धोनीच्या स्टाईलने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. फेब्रुवारी 2020 मध्ये केदार टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर केदारचे पुन्हा संघात पुनरागमन झाले नाही. केदार जाधव सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन माहिती दिली. माझ्या करिअरमध्ये पाठिंबा आणि प्रेम देणाऱ्या सर्वांचे धन्यवाद, दुपारी तीन वाजल्यानंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारातून मला निवृत्त मानलं जावं, असं केदार जाधवनं म्हटलं.

केदार जाधवने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. केदारनं भारतासाठी 73 एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्यानं 42.09 च्या सरासरीनं 1389 धावा केल्या होत्या. त्यानं या धावा101.60 च्या स्ट्राईक रेटनं केल्या होत्या. केदार जाधवनं 2 शतकं झळकावली असून 6 अर्धशतकं झळकावली आहेत. केदार जाधवनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजीच्या जोरावर 27 विकेट घेतल्या आहेत. केदारनं 2015 मध्ये झिम्बॉब्वे विरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 9 मॅचमध्ये 20.33 च्या सरासीरनं 122 धावा केल्या होत्या.

टीम इंडियातील अनुभवी शिलेदार जिंकणार का वर्ल्डकप?

India Player धोनीच्या स्टाईलनं निवृत्ती

केदार जाधवनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत आज दुपारी तीननंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त समजलं जावं असं म्हटलं. केदार जाधवनं एका व्हिडीओत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील फोटो’जिंदगी के सफर में…’ गाण्यासह शेअर केले आहेत. केदार जाधवनं महेंद्रसिंह धोनी प्रमाणं निवृत्ती जाहीर केली आहे. महेंद्रसिंह धोनीनं देखील क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना त्याच्या कारकिर्दीतील फोटो शेअर करत मै पल दो पल का शायर हूं हे गाणं त्यासोबत ठेवलं होतं. महेंद्रसिंह धोनीनं 2020 मध्ये निवृत्ती जाहीर केली होती.

केदार जाधवच्या निवृत्तीची इन्स्टाग्राम पोस्ट इथं पाहा केदार जाधवनं भारतीय संघासाठी काही मॅचेसमध्ये फिनिशरची भूमिका बजावली होती. महेंद्र सिंह धोनीनं केदार जाधवला बऱ्याचदा संधी दिली. केदार जाधवनं 93 आयपीएल मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 22.15 च्या सरासरीनं 1196 धावा केल्या. केदार जाधवनं आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चैलेंजर्स बंगळुरु, सनरायजर्स हैदराबाद, कोची टस्कर्स केरळ आणि दिल्ली डेअरडेविल्स या संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img