8.3 C
New York

T20 WorldCup: ॲरॉन जोन्स तर ख्रिस गेलपेक्षा भारी !

Published:

सुभाष हरचेकर

आंतरराष्ट्रीय स्तरावरील टिवे्न्टी २० क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज म्हणून अर्थातच विंडीजचा माजी खेळाडू ख्रिस गेलचे नाव घेतले जाते. पण गेलचा वारसदार म्हणून आता अमेरीकन संघाचा उप- कर्णधार ॲरॉन जोन्सचे Aaron Jones नाव घेतले जाईल. आयसीसी टिवे्न्टी २० विश्वचषक स्पर्धेच्या T20 WorldCup सलामीच्याच सामन्यात जोन्सने चाळीस चेंडूंत चार चौकार आणि चक्क दहा षटकार ठोकत नाबाद ९४ धावा फटाकावून संघाला विश्वचषक स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला. गेलने २०१६ साली इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात एका डावात सर्वाधीक अकरा षटकार ठोकले आहेत.

भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार?

रविवार हा सुटीचा दिवस असल्याने असंख्य भारतीय क्रिकेट शौकीन ज्यावेळी साखरझोपेत होते, त्यावेळेस २९ वर्षीय जोन्स डलास मधील ग्रॅन्ड पेरी स्टेडियमवर कॅनडाच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्याने डावाच्या अठराव्या षटकात निखिल दत्तच्या एकाच षटकात एक चेंडू सोडून दोन षटकार ठोकत संघाला विजयी केले. आणखी एक चेंडू त्याला मिळाला असता तर षटकार ठोकूनच त्याने विश्वचषक स्पर्धेतील पहिले शतक झळकावण्याचा मान मिळवला असता.

ॲरॉन जोन्सचा जन्म बार्बाडोसमध्ये झाला असल्यामुळे चेंडू फटकावण्याचे बाळकडू त्याला लहानपणीच पाजले गेले आहे. विंडीजच्या इतर खेळाडूंप्रमाणे तो बिनधास्त आहे. सामना आटोपल्यावर त्याने जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्यावरून निदर्शनास येते की आत्मविश्वास जणू त्याच्या नसनसात भरला आहे. तो म्हणाला, संघ अडचणीत असताना मला कामगिरी करणे आवडते. वीस षटकांत दोनशे धावांपर्यंतचा यशस्वी पाठलाग करण्याची आमच्या संघाची क्षमता आहे. विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करत असल्याचे कोणतेही दडपण नव्हते असेही त्याने स्पष्ट केले. विजयी अमेरीकन संघाचा कर्णधार मोनांक पटेलने सलामीला येऊन सोळा धावा केल्या. संघाच्या विजयानंतर त्याने इशारा दिला की यापुढील आमचे प्रतिस्पर्धी संघ भारत किंवा पाकिस्तान असो, आमच्या संघ शक्तीवर कोणताच परिणाम होणार नाही. आम्ही आमच्या आक्रमक शैलीनेच उत्तर देऊ. कॅनडाच्या संघाने वीस षटकांत पाच खेळाडूना गमावून १९४ धावा केल्यावर अमेरीकेच्या संघाने तीन खेळाडूना गमावून १७ षटकांतच विजयाला गवसणी घातली. अमेरीकेचा पुढील सामना सहा जूनला पाकिस्तान विरूद्ध तर बारा जूनला भारतीय संघाविरूद्ध आहे.

पहिल्या सामन्यात अमेरिकेचा कॅनडाला धक्का

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img