पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचाराच्या तोफा थंडावताच ध्यानधारणा केलीयं. कन्याकुमारीस्थित स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान मोदींनी तब्बल 45 तास ध्यानधारणा केलीयं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यानधारणावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवल्याचं दिसून आलं मात्र, ध्यानधारणेनंतर मोदी यांनी एक पोस्ट शेअर केलीयं. लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस आधीच त्यांनी पोस्ट शेअर करीत अनुभव सांगितलेत.
Pm Narendra Modi पंतप्रधान मोदी पोस्टमध्ये नेमंक काय म्हणाले?
लोकशाहीची जननी असलेल्या आपल्या देशात मोठा उत्सव पार पडला. मागील तीन दिवस ध्यानधारणा केल्यानंतर आता दिल्लीला जाण्यासाठी विमानात बसतो आहे. माझ्यासोबत एक नवीन ऊर्जा सोबत घेऊन येत निघालो आहे. 2024 च्या निवडणुकीत मी अनेक योगायोग पाहिले. हा आपल्या देशाचा अमृतकाळ आहे. निवडणुकीचा प३चार मी 1854 च्या उठावाचं प्रेरणास्थळ असलेल्या मेरठ येथून सुरु केला. त्यानंतर माझी शेवटची सभा पंजाबमधील होशियारपूर भारताचा प्रवास करताना या ठिकाणी पार पडली. संत रविदास यांची ही भूमी आहे. माझ्या मनात विरक्तीचा भाव निर्माण झाला. कन्याकुमारीच्या तीन दिवसाच्या अध्यात्मिक यात्रेत वेगवेगळे अनुभव एवढी मोठी जबाबदारी पार पाडत असताना अशा प्रकारे ध्यान करणं कठीण असतं. मात्र मी हे साध्य स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने करु शकलो. माझ्या विचारांना कन्या कुमारीच्या उगवत्या सूर्याने नवी उंची दिली.तर समुद्राच्या विस्तीर्णतेने माझ्या विचारांना दृढता दिली. ब्रह्मांडातल्या एका सुंदर शांततेचा आणि एकाग्रतेचा अनुभव मी ध्यानधारणेत गेला.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
भारताची ‘डिजिटील इंडिया मोहिम’ सगळ्या जगासाठी आदर्श ठरते आहे. गरीबांना सशक्त करण्यात या मोहिमेचा मोठा सहभाग आहे. आज प्रगतीचे नवे आलेख आपला देश ओलांडतो आहे. भारताच्या प्रगतीसाठी आता यापेक्षा मोठी संधी नाही. आपल्या देशासह आपल्या बरोबर असणाऱ्या देशांसाठीही ही मोठी संधी आहे. जी २० च्या यशानंतर जगभरात भारताचं कौतुक होतं आहे. आता आपल्याला नवी स्वप्नं बघायची आहेत. त्यासाठी आपण मार्गक्रमण सुरु केलं असल्याचं मोदींनी पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान, वैश्विक परिदृश्याचा विचार करता पुढे जाण्यासाठी आपल्याला काही बदलही करावे लागतील. २१व्या शतकातील जग आज भारताकडे खूप आशेने पाहत आहे. सुधारणा याबाबतचा पारंपरिक विचारही आपल्याला बदलले पाहिजे. आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सुधारणेच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागेल. आपल्या सुधारणा विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला अनुरूप असायला पाहिजेत, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केलायं.