अंतरवाली सराटी
लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) निकालांतर आपण पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली होती. मराठा आरक्षण तसेच सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. 4 जूनपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू करणार आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला गावकऱ्यांनीच विरोध केला असून त्यांनी परवानगी देऊ नये अशी मागणी अंतरवाली सराटीमधीलच काही गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मात्र, जरागेंच्या आंदोलनास आता अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच विरोध केला आहे. त्यामुळे, जरांगे पाटील यांचं उपोषण अंतरवाली सराटी गावात होणार की ते आपला उपोषणसाठीचं ठिकाण बदलणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मनोज जरांगेंच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलेल्या अंतरावाली सराटी गावातील लोकांनीचा आता त्यांच्या आंदोलनास विरोध केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह 5 ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर 70 गावकऱ्यांच्या सह्या आहेत.