मुंबई
लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) निकाल उद्या 4 जून रोजी लागणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमधून (MahaYuti) एकत्रित लढलेले पक्ष विधान परिषदेची निवडणुकीमध्ये (Vidhan Parishad Election) एकमेकांसमोर उभे असणार आहे. मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) मध्ये होत असलेल्या शिक्षक मतदार संघ आणि पदवीधर मतदारसंघ करीत 26 जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मनसे या सर्वांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये महायुतीतील हे सर्व पक्ष महाविकास आघाडी विरोधात नव्हे तर आपल्याच मित्र पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात उभे असणार आहे.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनसे या सर्व पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्रित लढवली होती. मनसेने या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरिता बिनशरता पाठिंबा दिला होता. मनसेने या विधान परिषद निवडणुकीमध्ये सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केला होता. त्यामुळे मनसेला या निवडणुकीमध्ये पाठिंबा देणार अशी चर्चा होते मात्र नंतर सर्वच मित्र पक्षांनी देखील आपले उमेदवार जाहीर केल्या.
मनसेने कोकणातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवार जाहीर करुन टाकला. शिवसेनेने संजय मोरे यांना उमेदवारी दिली. यामुळे कोकणात शिवसेना, भाजप आणि मनसे या महायुतीमधील तीन पक्षात लढत होणार आहे.
भाजप आणि शिवसेना लोकसभा निवडणूक एकत्र लढले. त्यानंतर दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्यावर राज ठाकरे यांची मनसेही महायुतीत आली. भाजपचे आमदार असलेल्या या जागेवर आधी मनसेने आपला उमेदवार जाहीर केला. पानसे यांना मनसे उमेदवारी दिल्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांचे तिकीट कापले जाणार की काय? अशी चर्चा सुरु झाली. परंतु भाजपने त्यांचे तिकीट जाहीर केले. त्यानंतर शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनाही कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली. यामुळे महायुतीमधील पक्षातच तिरंगी लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज ठाकरे यांनी आपली वेगळी वाट धरली. परंतु शिवसेना आणि भाजप उमेदवार समोरासमोर आले आहे. यामुळे लोकसभा निकालापूर्वी कोकणात चर्चा रंगली आहे.