18.8 C
New York

Kolhapur Accident : कोल्हापूरात कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Published:

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये भीषण अपघाताची (Kolhapur Accident) घटना समोर आली आहे. भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. त्यानंतर या कारने चौघांना चिरडले. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरच्या सायबर चौक परिसरामध्ये ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिला जखमी झाल्यानंतर उपचारासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये आणले होते. यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी काही तरुणांची नावे घेत अटक करण्याची मागणी केली. यावेळी कारमध्ये नसलेल्या तरुणांची नावे घेऊ नका, असे म्हणत काही तरुणांनी महिलेच्या नातेवाईकांशी वाद घातला. यावेळी दोन गट आमने-सामने आले होते. गुन्हा दाखल केल्यास पाहून घेऊ, अशीही धमकी देण्यात आल्याची चर्चा होती.

मैनाबाई काही घरांमध्ये स्वयंपाकांच्या काम करीत होत्या. शनिवारी दुपारी घराबाहेर पडल्यानंतर गल्ली समोरून आलेल्या भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली होती. त्यांना गंभीर अवस्थेत कारमधील चार ते पाच जणांनी सीपीआरमध्ये दाखल केले होते. अपघाताची माहिती मिळताच महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी सीपीआरमध्ये अपघात विभागात थांबत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या तरुणांना जाब विचारला. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img