22.3 C
New York

Narendra Modi : कन्याकुमारीतील साधनेतून नवे संकल्प आकाराला, मोदींचं देशवासियांना पत्र!

Published:

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर तामिळनाडूतील कन्याकुमारी (Kanyakumari) येथील विवेकानंद रॉक मेमोरियल मध्ये 45 तास ध्यानधारणा केली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर देशवासीयांना पत्र लिहून या ध्यानधारणेचा (Sadhana) अनुभव आणि आगामी वाटचालीसंबंधी विचार प्रगट केले आहेत.

लोकसभा निवडणुकी एक्झिट पोल 31 मे रोजी समोर आला आहे. यामध्ये पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्याला पार पडणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासींना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या पत्रात सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

मोदीनी लिहिलेल्या पत्रातील प्रमुख मुद्दे..

माझ्या प्रिय देशवासियांनो,

लोकशाहीच्या जननीत लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाचा एक टप्पा पूर्ण होत आहे. कन्याकुमारीच्या तीन दिवसांच्या आध्यात्मिक प्रवासानंतर मी विमानाने दिल्लीला निघालो आहे. काशी आणि इतर अनेक जागांवर मतदान सुरू आहे. खूप सारे अनुभव आहेत, संवेदना आहेत. मला माझ्या आत असीम ऊर्जेचा प्रवाह जाणवतो आहे.

खरंच, २०२४ च्या या निवडणुकीत अनेक आनंददायी योगायोग पाहायला मिळाले. अमृतकलच्या या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मी 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान असलेल्या मेरठ येथून प्रचाराची सुरुवात केली. भारतभर फिरत असताना या निवडणुकीची माझी शेवटची सभा पंजाबमधील होशियारपूर येथे झाली. संत रविदासजींची पवित्र भूमी आणि आपल्या गुरूंची भूमी, पंजाबमध्ये शेवटची सभा घेण्याचे सौभाग्यही विशेष आहे. यानंतर कन्याकुमारीत भारतमातेच्या चरणी बसण्याची संधी मिळाली.

त्या सुरुवातीच्या क्षणी माझ्या मनात निवडणुकीचा आवाज घुमत होता. रॅली आणि रोड शो मध्ये दिसणारे असंख्य चेहरे माझ्या डोळ्यासमोर येत होते. माता, भगिनी आणि मुलींच्या अपार प्रेमाची ती लाट, त्यांचे आशीर्वाद त्यांच्या डोळ्यातला माझ्यासाठीचा विश्वास, ती आपुलकी मी सगळं आत्मसात करत होतो. माझे डोळे ओले होत होते. मी शून्यात जात होतो, ध्यानात शिरत होतो.

काही क्षणाचे राजकीय वादविवाद, हल्ले आणि प्रतिआक्रमण. आरोप-प्रत्यारोपांचे आवाज आणि शब्द, ते सगळे आपोआप शून्यात गेले. माझ्या मनातील अलिप्ततेची भावना अधिक तीव्र झालमाझे मन बाह्य जगापासून पूर्णपणे अलिप्त झाले. एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये अशी साधना करणे अवघड आहे. पण कन्याकुमारीच्या भूमीने आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने ते सोपे केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img