26.6 C
New York

Drama: कलासक्त मुंबईची हवा; पाच लेखक – पाच विषय – पाच वेगळे सादरीकरण

Published:

मुंबई

सध्या जरी सगळीकडे राजकीय चर्चा असली तरी अस्सल प्रेक्षक मात्र त्यांना हव्या असलेल्या कलाकृतीचा शोध बरोबर घेत असतो. मोठमोठ्या सिनेमा आणि नाटकांच्या (Drama) भाऊ गर्दीमध्ये मुंबईतील एका नावाजलेल्या नाट्यसंस्थेने ५ दर्जेदार एकांकिका एकाच तिकिटावर उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या ७ जूनला श्री शिवाजी मंदिर, दादर येथे कलासक्त मुंबई एकांकिका महोत्सव पार पडणार आहे. अनेक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेंमध्ये गाजलेल्या पाच लेखक – पाच विषय – पाच वेगळे सादरीकरण असलेल्या या महोत्सवाला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कै. श्री. रामनाथ पाटील आणि कै. कु. निशांत निगुडकर स्मृती च्या आधारे आयोजित केलेल्या या संस्थेने अनेक कलाकार मराठी रंगभूमीला दिले. या संस्थेचे संस्थापक तसेच दिग्दर्शक योगेश कदम गेले कित्येक वर्ष सातत्याने रंगभूमीची अखंड सेवा करत आहेत. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना लोकांसाठी दर्जेदार कलाकृती आणि आपल्या सोबत असलेल्या मुलांना उत्तम व्यासपीठ कसं मिळेल याकडे त्यांचा कायम कल राहिला आहे.

दर्दपोरा, राकस, वो ही हू मैं, इंटेरोगेशन, ओल्या भिंती अशा एका पेक्षा एक सरस एकांकिका यावेळेस उपस्थितांना पाहायला मिळणार आहेत. ह्यात राजश्री जमदाडे, डॉ. यशश्री कंटक, अर्चिशा मोरे, कोमल सारंगधर, गौरव पाटील, जितेंद्र मेस्त्री, सिद्धेश आरोसकर, योगेश कदम आणि कलासक्तचे इतर महत्वाचे शिलेदार वेगवेगळ्या भूमिकामधून दिसणार आहेत. सगळ्या नाटकांची प्रकाशयोजना श्याम चव्हाण करणार आहेत आणि नेपथ्य विनय गोडे याचे असणार आहे. या महोत्सवासाठी अनेक मान्यवर, तंत्रज्ञ, नेपथ्यकार, कलाकार यांची मांदियाळी असणार आहे. या स्पर्धेला माध्यम प्रायोजक म्हणून मुंबई आऊटलूक आपली भूमिका बजावणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img