मुंबई
मुंबईतील (Mumbai) मंत्रालयातील आयएएस अधिकारी विकास रस्तोगी (Vikas Rastogi) आणि राधिका रस्तोगी (Radhika Rastogi) या आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोरील राहत्या घराच्या बिल्डिंग वरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.
आयएएस अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीवरुन पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या मुलीचे नाव लिपी रस्तोगी असे आहे. लिपी ही कायद्याचे शिक्षण घेत होती. लिपी रस्तोगीच्या आत्महत्येचं पाऊल उचलण्यामागचं कारणही समोर आलं आहे.
आज सोमवारी सकाळी चार वाजता १० मजली इमारतीवरून उडी घेतली. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला आहे. उडी घेतल्यानंतर तरुणीला तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर जीटी रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं. लिपीच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. लिपीच्या पार्थिवावर १ वाजता चंदनवाडी स्मशानभूमीवर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.