Dalljiet Kaur : अभिनेत्री दलजीत कौरच्या (Dalljiet Kaur) आयुष्यात मोठं वादळ आल्याचं पाहायला मिळतंय. दलजीत कौर आणि तिच्या पतीमधलं भांडण टोकाला गेल्याच बघायला मिळतंय. हेच नाही तर आता सतत दोघेही एकमेकांवर बरेच गंभीर आरोप करताना दिसत आहेत. अशातच आता दलजीत कौरची अडचण वाढलीये.
Dalljiet Kaur : टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आलीये. दलजीतच्या आयुष्यात मोठं वादळ आल्याचं दिसतंय. बऱ्याचदा दलजीत कौरच्या घटस्फोटाच्या चर्चा जोरदार रंगताना दिसत आहेत. दलजीत कौरने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे दिलजीतचा पती निखिल पटेल (Nikhil Patel) याने देखील हैराण करण्यासारखे खुलासे उघड केले आहेत. दोघांमधले वाद आता टोकाला गेल्याच पाहायला मिळतंय. मार्च २०२३ मध्ये दलजीत कौरने (Dalljiet Kaur) निखिल पटेल (Nikhil Patel) याच्यासोबत लग्न केलं. आता लग्नाला वर्ष पूर्ण होताचं यांचा काडीमोड होण्याच्या चर्चाना उधाण आलंय.
निखिल पटेलने दलजीत कौरला कायदेशीर नोटीस पाठवली असल्याचं कळतंय. यामुळे दलजीतच्या आयुष्यात अडचणीची मोठी वाढ झाल्याचं स्पष्ट झालय. निखिल पटेल याने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 (भारत), भारतीय दंड संहिता, आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 (भारत) अंतर्गत नोटीस दलजीत कौरला पाठवली आहे. सोशल मीडियावर विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप करणं चुकीचं आहे, असं मत निखिल पटेलच आहे.
http://कलासक्त मुंबईची हवा; पाच लेखक – पाच विषय – पाच वेगळे सादरीकरण
निखिल पटेल याने म्हटलंय की, ह्या सर्व गोष्टी पाहणं माझ्यासाठी खूपच त्रासदायक आहे मी जगातला एक सामान्य नागरिक आहे. भारतात आणि जागतिकस्तरावर ऑनलाईन संरक्षण कायद्याच्या अभावाचा फायदा लोक घेत असतात. फक्त प्रसिद्धी मिळवायची असते म्हणून लोक सोशल मीडियावर काहीही पोस्ट शेअर करत असतात. असे बरेच आरोप निखिल याने केले आहेत.
निखिलच्या सांगण्यानुसार, त्याच्या टीमकडून कायदेशीररित्या स्पष्ट करण्यात आलंय की, भविष्यात कोणत्याच प्रकारचं शोषण सहन केलं जाणार नाहीये. जर दलजित कौरने तिचे बेकायदेशीर नाटक सुरूच ठेवले तर तिच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अशातच आता ह्यावर दलजीत कौरकडून काहीही भाष्य करण्यात आलेलं नाहीये. सर्वांच्या नजरा दलजीत कौर काय भाष्य करेल यावर लागलेल्या आहेत.